मनोबोधाची आरती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> वेदांचे जें गुह्य शास्त्रांचें जें सार । प्राकृतशब्दांमाजी केला विस्तार ॥ कर्म उपासना ज्ञान गंभीर । ज्याच्या मननमात्रें आत्मा गोचर ॥ १ ॥

जय देव जय देव जय मनोबोधा । पंचप्राणें आरती तुज स्वात्मशुद्धा ॥ ध्रु ॥

दोन शतें पांच श्र्लोक हे जाण । श्रवणें अर्थें साधक पावति हे खूण ॥ परमार्थासी सुलभ मार्ग हा पूर्ण । यशवंत सद्गुरु दासाचा प्राण ॥ २ ॥

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg