Jump to content

भारता'साठी/'भारता'साठी

विकिस्रोत कडून



'भारतासाठी




शरद जोशी





जनशक्ती वाचक चळवळ



 प्रकाशकाचे मनोगत


 'इंडिया' आणि 'भारत' ही मांडणी मोठ्या प्रभावीपणे शरद जोशी यांनी केली. आता ही मांडणी बरेचजण वापरत आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळातही हा भेद भारतीय सरकारने ठसठशीतपणे तसाच ठेवला. शरद जोशी यांचे सर्व लिखाण संकलित करून ग्रंथस्वरूपात आणत असताना 'भारता'साठी या नावाने चौऱ्याहत्तर लेख वेगळे काढले. त्या सर्व लेखांचे परत दोन भाग केले- अर्थ, उद्योग, व्यापार, कामगार या प्रश्नांवरचे लेख वेगळे केले तर राखीव जागा वीज दरवाढ, छोटी राज्ये, सामाजिक समस्या आदी संदर्भातल्या लेखांचे संकलन भारतासाठी या नावाने ठेवले.
 या संकलनासोबत शरद जोशी यांचे समग्र लिखाण प्रकाशित करण्याचा प्रकल्प आम्ही पूर्ण करीत आहोत. 'पोशिंद्याची लोकशाही' हे पुस्तक या सोबतच प्रकाशित होत आहे. शेगाव येथील शेतकरी महामेळाव्यात या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन होत आहे.

 शरद जोशी यांची एकूण १५ पुस्तके आम्ही प्रकाशित केली. यापैकी चार पस्तके यापर्वीच प्रकाशित झालेल्या पस्तिका.लेखसंग्रह यावर आधारित आहेत तर अकरा पुस्तके पूर्णत: नवीन आहेत. शरद जोशी यांनी प्रामुख्याने शेतकरी संघटक' या पाक्षिकातून लिखाण केले, तसेच याशिवाय दै. लोकमत, दै. देशोन्नती यातील लिखाण या पुस्तकांमध्ये समाविष्ट आहे. 'द हिंदू बिझनेस लाईन' मध्ये त्यांनी लिहिलेल्या इंग्रजी लेखांचे अनुवाद 'शेतकरी संघटक'मध्ये प्रकाशित झालेले होते, तेही विविध पुस्तकांमध्ये समाविष्ट केले आहेत.

 अभ्यासकांसाठी हे सर्व लिखाण पुस्तकस्वरूपात उपलब्ध करून आम्हाला आवश्यक वाटत होते त्याप्रमाणे ही पुस्तके उपलब्ध आहेत. जुन्या पुस्तकांमधील त्रुटी पुढील आवृत्तीच्या वेळी दुरुस्त केल्या जातील.

श्रीकांत अनंत उमरीकर