पान:Yugant.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



सोळा / युगान्त

पूर्वेकडच्या भाषांची (-‘एप्सिलॉन ε' हे ग्रीक अक्षर- हे मूळ धरून) नेपाळी, मैथिली व बंगाली ही महाभारते लिहिली गेली. ही सर्व महाभारते शारदा व 'K' ह्या पोथ्यांपेक्षा विस्ताराने मोठी आहेत. गंगेच्या खोऱ्यातील पोथ्यांपासूनच पण खूप भर पडून निघालेल्या पोथ्या म्हणजे देवनागरी लिपीतील पोथ्या, ह्यांत श्लोकसंख्या अतिशय आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व ह्या सर्व भागातील पोथ्यांतून घेतलेले भागही आहेत. दक्षिणेकडच्या मूळ ग्रंथातून खूप भर पडलेल्या ‘सिग्मा नावाच्या आवृत्तीच्या पोथ्या निघाल्या. तीतून ग्रंथ व तेलुगू पोथ्यांचा उगम झाला. दक्षिणेकडच्याच मूळ ग्रंथांतून पण नवीन भर न पडता साधलेली आवृत्ती ती मल्याळी भाषेतील पोथ्यांची
 ह्या पोथ्यांतील बहुतांश पोथ्यांवर कालनिदर्शक असा महिना वा वर्ष दिलेलेच नाही. ज्यांच्यावर दिलेले आहे. त्यांतील सगळ्यात जुनी नेपाळी पोथी इसवी सन १२००-च्या सुमाराची. सर्वात । अर्वाचीन इ. स. १८४२-मधली ! जी पोथी सर्व कामाला आधार म्हणून घेतलेली ती मुंबईत छापलेली व येथल्याच हस्तलिखितावर आधारलेली वर दिलेल्या देवनागरी परंपरेतील व भारुडभरती झालेली अशी निघाली. पण ती पोथी छापलेली असल्यामुळे विलायतेत व इकडे सर्वांना माहीत होती, व तीतले गेले काय, राहिले काय, हे येथल्या व तिकडल्या विद्वानांना तपासून पाहता येणे शक्य होते. सर्वत्र माहीत असलेल्या ह्या आवृत्तीचा 'The Vulgate' ह्या नावाने सर्वत्र उल्लेख आहे. (Vulgate = नेहमीच्या प्रचारातील सर्वांना ठाऊक असलेली आवृत्ती. हा शब्द मूळ इटालियन वा लॅटिन भाषेत असलेल्या बायबलच्या प्रतीला लावल होता. - Oxford Dictionary]
 ही निरनिराळी हस्तलिखिते पाहता असे दिसून आले की, 'शारदा' हे सर्वांत कमी श्लोकांचे महाभारत आहे. K-च्या बहुतेक आवृत्त्या त्याशी जुळत्या आहेत. नेपाळी आवृत्तीही त्याच्याशी खूप