पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. झाल्यावर सर्व शून्य होणे साहजिकच आहे. मनोरूपी यत्र चालू लागले की, इद्रियादि इतर यो प्रवृत्त होतात व ज्ञानादि क्रिया होतात, हे सर्वांस ठाऊक आहेच. पण विषयसस्कार किवा मागे सांगितलेल्या वासना मनास गति देत असतात त्यांस अडवून धरिले पाहिजे. पण दीर्घ प्रयत्नावाचून हे महत्कृत्य घडत नाही. यास्तव, बा रघुनदना, तूं वास- नांचा उद्भवच न होईल, असा मोठ्या शौर्याने यत्न कर. शूर पुरुषा- वाचून परम पदास जिकण्याचे हे अवघड काम होणार नाही. विचार हे या विजयातील मुख्य अस्त्र आहे. आचारसपन्न शुद्धचित्त पुरुषास या परमास्त्रानेच परमानदाचा लाभ होतो १९. सर्ग २०-प्रज्ञावृद्धीचा प्रकार, महापुरुषाचे लक्षण व सदाचार याचे या सात वर्णन केले आहे श्रीवसिष्ठ-रामा, प्रथम साधूची संगति धरावी. त्याच्या उपदेशा- प्रमाणे युक्तीने बुद्धि वाढवावी. त्यानंतर महापुरुषांच्या लक्षणानी आपणा- मध्ये महापुरुषता आणावी. सर्व उत्तम गुण एकाच पुरुपाचे ठायीं नसतात. यास्तव ज्या ज्या पुरुषामध्ये जो जो विशेष गुण आढळेल तो तो आप- णामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. सर्व गुणसपन्न होणे हीच महापुरुषता होय. ती शमादिगुणाच्या योगाने तर फारच शाभते. पण आत्म्याच्या यथार्थ ज्ञानावाचून कोणतीही सिद्धि मिळत नाही. ज्ञानाच्या योगाने शमादिकाची वृद्धि होते व शमादि उपागच्या योगाने ज्ञानाची वृद्धि होते. वृष्टीमुळे जसे धान्यास अकुर येतात त्याप्रमाणे सदाचरणामळे शमादि गुणाचा उद्भव होतो. यास्तव सदाचरण मर्वात अधिक प्रशस्त होय. पण ते ज्ञानावाचून सभवत नाही. सारा मटाचार, ज्ञान व शमादि गुण एकमेकाच्या वृद्धीस कारण होतात. यास्तव त्याचा एकाच काळी व सारख्याच आद- राने अभ्यास करावा. शेतास राखणाऱ्या स्त्रिया, पक्ष्यानी उडून जाके म्हणून टाळ्या वाजवितात व त्याबरोबर गाणी गावून आपले चित्त- रंजनही करून घेत असतात. त्याप्रमाणे आसक्ति, क्रोध, लोभ, इत्यादि- काचे निवारण करण्याकरिता शमादिकाचा अभ्यास करू लागले असतां, ज्ञानादिकाची वृद्धि हे फल सहज मिळते. असो, दशरथनंदना, मी तुला येथवर ज्ञानाची सदाचारादि साधने पुनः पुनः प्रसग आणून सागितली,