पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरणं-सर्ग १९. ९५ होतात. पण त्यामुळे त्याची मोठी हानि होते, हे त्याच्या ध्यानात येत नाही. आत्मतत्व सर्वत्र सम आहे. ते वादाचा विषय नव्हे. पण अभिमानी पंडितास हे परम सत्य कळत नाही; किवा कळत असूनही त्याप्रमाणे त्याचे आचरण होत नाही. आत्मवस्तु एका प्रकारची असताना केवल अभिमानाने ती भलत्याच प्रकारची आहे, असे ते प्रतिपादितात. पण त्यामुळे आपलाच आत्मा मलिन होतो हे त्याच्या ध्यानात येत नाही. अनेक वादी अनेक प्रमाणाची कल्पना करीत असतात, पण त्या सर्वांचे प्रत्यक्-आत्मतत्त्व हेच एक प्रमाण आहे. सर्व प्रमाणाचे सार इद्रिये आहेत व सर्व इद्रियाचे सार अपरोक्ष ज्ञान आहे. अपरोक्ष ज्ञानच मुग्य प्रत्यक्ष होय. अनुभव, प्रतिपत्ति, वेदन ही त्या साक्षी चैतन्याची यथार्थ नावे आहेत. प्राणधारण केल्यामुळे साक्षीसच जीव ह्मणतात. बुद्धि-वृत्ति- युक्त साक्षिचैतन्यास सवित् ह्मणतात. तीच बुद्धि-वृत्तिद्वारा बाह्य पदाथांशी मंगत होऊन तदाकार झाली असता, विषय होते. साराश कर्ता, करण, कार्य, भोक्ता, भोगसाधन, भोग्य, ज्ञाता, ज्ञानसाधन, ज्ञेय इत्यादि त्रिपुट्या या साक्षिचैतन्याहून भिन्न नाहीत. अथवा साक्षिचैतन्याचीच ती भिन्न भिन्न अवस्थेतील नावे आहेत. पाणीच जसे तरगरूपाने दिसते त्याप्रमाणे हे चैतन्यच जगद्रूपाने भासते. ते साक्षिप्रत्यक्ष सृष्टीच्या आरभी निष्कारण असते. पण पुढे स्वतःच सर्ग-लीलेने स्फुरण पाऊन आपले आपणच कारण होते. पण एकच वस्तु अज्ञानावाचून आपलेच आपण कारण व कार्य होऊ शकत नाही. आत्म्याच्या अज्ञानामुळेच जीवभाव येऊन, जग सत्य आहे, असा भास होतो. तस्मात् हे जग आरोपित आहे. विचार सुद्धा आत्म्याचेच रूप आहे. तेव्हां तो जगदम दूर करून परम पुरुषार्थरूप प्रत्यक्ष करितो, हे ह्मणणे सुद्धा बरोबर नाही. कारण विचार, प्रत्यक्ष किवा आणखी काहीही या साक्षिचैतन्याहून निराळे नाही, असे वर सागितलेच आहे. यास्तव विचारी पुरुष जेव्हा आत्मरूप होऊन जातो तेव्हा त्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही तो सत् आहे, असेही ह्मणता येत नाही व असत् आहे, असेही ह्मणवत नाही. असल्या विचाराने मन अति शात होते, देह व इंद्रिये याची प्रवृत्तिही बंद होते, व जग सत्य आहे, असे पुनरपि चाटत नाही. मन हेच सर्व प्रवृत्तीचे कारण आहे. तेव्हा तें निश्चल