पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ बृहद्योगवासिष्टसार. ते विसरू नको. एक, अद्वितीय व ज्ञानस्वरूप आत्मतत्त्वच वेदाताचा विषय आहे व तोच शास्त्रार्थ आहे. त्याचा साक्षात्कार झाला असता महा-वाक्यार्थ सिद्ध होतो, अज्ञान व अज्ञानाचे "मी कर्ता, भोक्ता" इत्यादि कार्य नष्ट होते व त्यामुळे परम शाति अनुभवास येते. तेच निर्वाण होय. असल्या या निर्वाणाकडे सर्व लक्ष्य ठेवून उत्तम अधि- काऱ्याने या दृष्टातादिकाच्या भानगडीतही फारसें पडू नये. कोणत्या तरी युक्तीने शाति देणाऱ्या महावाक्याच्या अर्थाचा आश्रय करावा. कारण शाति हेच परम श्रेय आहे. करिता तिच्या प्राप्तीविषयी प्रयत्न करावा. कारण तयार होऊन पुढे आलेल्या भाताने क्षुधाशाति करून घ्यावयाची सोडून त्याच्याविषयी व्यर्थ तर्क करीत बसण्यात फारसे भूषण व लाभही नसतो. मुलाने औषध प्यावे ह्मणून त्यास त्याची आई किवा आजी- बाळा, हे औषध पी, ह्मणजे तुझी शेंडी तुझ्या मोठ्या भावाप्रमाणे लाब होईल, असे सागते. त्यामुळे हे औषध आपले इष्ट कार्य करणारे आहे, असें त्या बालकास वाटते व तो ते कडु असले तरी घेतो. त्याप्रमाणेच साधकाची रुचि वाढविण्याकरिता किवा हे इष्ट साधन आहे, असे त्यास समजावे ह्मणून शास्त्रात दृष्टात व युक्त्या योजिलेल्या असतात. त्याचा योग्य उपयोग करून घ्यावा व परम पद मिळवावे. अविवेकी होऊन भोगामध्ये गढून जाऊ नये. विचारी होऊन शाति देणाऱ्या शास्त्राचे सतत अध्ययन करावे. शास्त्राचा उपदेश, सौजन्य, सात्त्विक बुद्धि व आत्मसाक्षात्कार यानी अधिक अधिक सपन्न होऊन धर्मक्रिया कराव्या. परम शाति प्राप्त होई तो शास्त्रार्थाचा विचार करीत रहावे. आत्म्याच्या स्वरूपामध्ये स्थिर झाल्यामुळे भवसागरातून पार निघून गेलेल्या गृहस्थास व यतीस ऐहिक व पारलौकिक फलाची आशा नसते. त्यामुळे तो कृतकृत्य होतो. अशा पुरुषाने शात व गभीर होऊन रहावे. आत्म्याचा बोध आपल्या हिताकरिता करून घ्यावा. “मी ज्ञानी आहे, मी वेदाती आहे, तुह्मी सर्व अज्ञ आहा, पामर आहा, ससारी आहा" इत्यादि आसुरी शब्द तोडातून उच्चारून, स्वस्तुति व परनिदा ही महा पापे करण्याकरिता, केवल शाब्द बोध करून घेऊन, तेवढयानेच आपणास धन्य मानून घेऊ नये. काही विद्वान् खडन-मडनादि "विक्षेप उत्पन्न करणाऱ्या व वाद-विवादात्मक कर्मामध्ये मोठ्या रुचीने प्रवृत्त