पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. दिला असेल तेवढ्याच पुरता ब्रह्म-बोध करून घ्यावा. जसे ब्रह्माच्या ठायी है जग रज्जु-सर्पाप्रमाणे भ्रातिकल्पित आहे, असे मटल्यास दोरीच्या आश्रयाने सापाचा भ्रम होणे, एवढाच दृष्टाताचा भाग दार्टातिक ब्रह्माचे ठायी घ्यावा. दोरीप्रमाणे ते दृश्य असले पाहिजे, लाब असले पाहिजे, मद अधकारात पडलेले असले पाहिजे, इत्यादि दोरीचे अन्य धर्म घेण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे दार्शतिक ब्रह्माचे सत्यत्वादि धर्म दोरीचे ठाय। असले पाहिजेत, असेही समजण्याचे कारण नाही. ब्रह्म सर्व सृष्ट पदा- हिन विलक्षण आहे. तेव्हा त्याला सर्व प्रकारे सदृश दृष्टात कसा मिळ- णार ? पण श्रोत्यास त्या निरुपम तत्वाची काही कल्पना करिता यावी ह्मणून या स्वप्मतुल्य मिथ्या जगातील पदाथांचे एकदेशी दृष्टात द्यावे लागतात व साक्षात्कार होई तोच त्याचे महत्त्व असते. कारण ब्रह्मात्म- जान झाले झणजे हे सर्व दृष्टात व शास्त्रे निरुपयोगी व खोटी भामृ लागतात, व हे सर्व, मावकास मार्ग दाखविण्याकरिता योजिलेले उपाय आहेत, असे कळून येते. परतु शास्त्राभ्यासान्या योगाने ज्याच्या चित्तावर उत्तम सस्कार झालेले नसतात त्याम " हे जग मिथ्या आहे," असे एकाएकी समजत नाही. कारण “ हे सर्व सत्य आहे " अशाप्रकारचा त्याचा दृढ व अनादी सस्कार लवकर जात नाही जगला स्वप्नातील, मनो- राज्यातील व ध्यानसमयी मानसपूजेकरिता कल्पनेने तयार केलेल्या नगराचा लोकिक दृष्टात दिला आहे व तो मात्र जगाला सर्व प्रकारे लागू आहे, असे समजावे. कारण ब्रह्माप्रमाणे जग सृष्टीहून अत्यत विलक्षण नाही. अथवा शास्त्रीय किवा लौकिक कोणताही दृष्टात एकदेशीच ध्यावा. कारण मणि (रत्न ) दिव्याप्रमाणे दिसतो, असे झटल्यास मण्यामध्ये दिव्याप्रमाणे तेल, वात इत्यादि सर्व आहे, असे कोणी समजत नाही. तर प्रकाश हा अश त्या दोघाच्या ठिकाणी सारखाच आहे, एवढेच लोक समजतात. यास्तव दृष्टाताचा एक अश घेऊन दार्टातिकाची कल्पना करावी. तिच्या योगाने ब्रह्माचे परोक्ष ज्ञान झाले असता, अविद्येचा नाश होण्याकरिता " मी ब्रह्म आहे " या महावाक्याच्या अर्थाचा निश्चय करावा. “ जगांतील सर्व अनुभवाच्या विरुद्ध मी असे कसे समजूं," असें ह्मणून आपली अश्रद्धा किंवा शुष्क तार्किकता व्यक्त करू नये. कारण “ मी ब्रह्म आहे " अशी निरतर भावना केल्यामुळे