पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुब्यवहारप्रकरण-सर्ग १८ ९१ करावे. याचे श्रवण, मनन व निदिध्यासन केले असता तप, ध्यान, जप इत्यादिकाचे फल मिळते व मोक्षाचा मार्ग व्यक्त होतो. याच्या वारवार अभ्यासाने विलक्षण पाडित्य येते. "हा मी" व "हे जग" हा भ्रम आपोआप नाहीसा होतो. चित्रातील सर्प पाहून जसे कोणालाही भय वाटत नाही त्याप्रमाणे ज्ञानी पुरुपास या चित्रतुल्य जगाकडे पाहून व त्यातील अनेक अवस्थाचा अनुभव घेऊन मुखदु.- खादि वाटत नाही. ज्ञानास प्रतिबव करणाऱ्या दोषाचे निरसन कसे करावे हे समजण्यास अध्यात्मशास्त्र हाच एक उत्तम उपाय आहे. झाडाचे फूल व पान तोडावयासही काही आयास लागत असतील; पण योग्य अधिकाऱ्यास या सहितेच्या अध्ययनानतर परम पदाच्या प्राप्यर्थ काही आयास करावे लागत नाहीत. कारण अतःकरणालाही स्पदनरहित करून सोडावे, असा उपदेश यात केलेला आहे मुखदायी आसन घालून, मिळेल ते खाऊन, सदाचाराच्या विरुद्ध असलेला आचार सोडून आणि देश व काल यास अनुसरून विचार करून, जो धन्य पुरुष या अथवा दुसऱ्या सच्छास्त्राचा अभ्यास करितो व यथासभव सत्सग करितो, त्यास ससाराची शाति करणारा महाबोव होतो, व त्याच्या योगाने तो अपवित्र गर्भाशयातून व असह्य क्लेशातून मुक्त होतो. पण जे पापी अशा या घोर यातनेस व यातनामय ससारास भीत नाहीत व भोगामध्ये निमग्न होऊन रहातात त्या कृमितुल्य अधमाचे नावही घेऊ नये. __ असो, राघवा, आना हे सदर शास्त्र कसे श्रवण करावे ते सागतो. यात दृष्टाताचे प्राधान्य आहे. यास्तव दृष्टात ह्मणजे काय हे मी तुला सागतो. ज्या अनुभवास आलेल्या वस्तूचा निर्देश करून त्यावरून इष्ट अर्थाचे ज्ञान करून देतात, त्यास दृष्टात ह्मणतात. तो बोधद्वारा उपकारक आहे अपूर्व, ह्मणजे कधी अनुभवास न आलेली, वस्तु किवा स्थिति दृष्टाता- वाचून समजून देता येत नाही. पण रामा, मी जे दृष्टात देणार आहे, ते सर्व सकारण ह्मणजे जन्य व त्यामुळेच असत्य असणार, हे उघड आहे. पण त्यावरून ज्याचा बोध करून घ्यावयाचा ते परमार्थ सत्य व नित्य आहे. यास्तव मृत्तिका, सुवर्ण, इत्यादि असत् पदार्थाचे दृष्टात देऊन मी जरी तुला सत्य ब्रह्माचे ज्ञान करून देणार आहे, तरी जन्यत्व, मिथ्यात्व इत्यादि दृष्टाताचं इतर वर्म सोडून, जेवढ्या पुरता दृष्टात