पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सगे १८. होतो, मनोन्यापार बद होतात, कार्य, कारण, कर्तृत्व, हेय, उपादेय इत्यादि कल्पना नाहीशा होतात, देहयुक्त असलेला मानव देहरहित असल्या- सारिखा होतो, संसारात असूनही निःससार बनतो, मोठ्या पाषाणा- प्रमाणे चैतन्यघन, चैतन्यसूर्य असूनही वृत्तिरहित झाल्यामुळे प्रकाशरहित असल्यासारिखा, अहकारशून्य व ममतारहित असा तो अधिकारी जीवन्मुक्त होतो त्या महाबुद्धिमानाच्या हृदयाचा विस्तार हरि-हरादिकाच्या हृद- याहून इतका वाढतो की, त्याची लक्षपटीनेही तुलना करिता येत नाही. तात्पर्य, बा रामा, या प्रकरणाच्या योगाने, अनुभवास येणा-या आत्म- वस्तूचा विस्तार मर्यादारहित आहे, हे साक्षात् समजते १७. सर्ग १८–येथे या ग्रयाचे गुण, मुख्य गौण व आनुपगिक फळ व उपमेंतील ___ ग्राह्य अश याचे वर्णन करितात श्रीवसिट्र-रघुनदना, उत्तम क्षेत्रात योग्य समयी पेरलेल्या चागल्या बीजापासून जसे विपुल फल मिळते, त्याप्रमाणे ही सहिता वाचताच उत्तम बोध होतो आता अनेक अपौरुषेय वेदवाक्ये व उपनिषदे आत्मबोध करीत असताना, त्यास सोडून या पुरुषाने केलेल्या सहितेचाच अभ्याम करण्याविषयी तुह्मी इतका आग्रह का करिता-ह्मणून तू विचारशील तर सागतों-युक्तीच्या द्वारा बोध करून देणारे शास्त्र पुरुपप्रणीत जरी असले तरी ते स्वीकार करण्यास योग्य होते. यास्तव, पुरुषाने न्यायी व्हावे. वेदवाक्ये व उपनिषदे अपौरुषेय आहेत, ह्मणजे त्यास कोणी शरीरधारी मानवाने काव्यादिकाप्रमाणे रचलेले नाही, हे खरे, व त्यामुळेच ती पूज्य आहेत पण त्याचा अभिप्राय अति गूढ आहे. त्यामुळे वाचकाम त्याच्या अर्थाचा यथार्थ बोध होत नाही ह्मणून आपल्या हिताकरिता, त्या प्रमाणभूत वैदिक श्रुतीचा त्याग करून या युक्तिपूर्ण व श्रुतिसारभूत ग्रंथाचे सेवन करावे. युक्तवचन बालकापासूनही ग्रहण करावे. अयुक्त- वचन ब्रह्मदेवाने जरी सागितले तरी त्याचा अव्हेर करावा. श्रुतिवचने अयुक्त नसली तरी ती सामान्य बुद्धीच्या मनुष्यास अग्राह्य आहेत व हा ग्रंथ श्रुतीचा अर्थ स्पष्ट करून सागण्याकरिताच प्रवृत्त झाला आहे. यास्तव, त्याचा आदराने अभ्यास करावा. कोणी ह्मणेल की, आह्मीं, आमच्या वशातील पूज्य लोकांनी रचलेले प्रथच वाचू, पण तुमचा हा श्रुतिसारभूत प्रथ वाचणार नाही. तर त्यांस आमचे