पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ बृहद्योगवासिष्ठसार. आपला पाय भाजावा अशी इच्छा नसतानाही, अग्नीवर तो पडला असतां जसा भाजतो, त्याप्रमाणे आपण मुक्त व्हावे अशी जरी कोणाची इच्छा नसली तरी ही सहिता नुसती कानावरून गेल्यास निर्वाण प्राप्त होते. ही अतिशय सुख व शाति देणारी आहे. यात अनेक युक्तियुक्त वाक्ये व दृष्टात आहेत. या सहितेची एकदर सहा प्रकरणे असून त्यातील वै- राग्यनामक पहिले प्रकरण आहे. त्यात तुझ्याच वैराग्याचे वर्णन करून, अधिकारी पुरुषास वैराग्य कसे प्राप्त झाले पाहिजे, ते सुचविले आहे. त्याच्या श्रवणाने श्रोत्याचे वैराग्य वाढते. त्याची प्रथसख्या दीड सहन आहे. त्या सर्व प्रकरणाचे उत्तम प्रकारे मनन केल्यास चित्त शुद्ध होते. मुमुक्षुव्यवहारनामक दुसरे प्रकरण असून त्याची प्रथसख्या एक सहस्त्रच आहे. या प्रकरणांत मुमधुच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. तिसरे उत्पत्तिप्रकरण अनेक दृष्टात व आख्यायिका यानी भरलेले आहे. त्याची ग्रंथसख्या सात सहस्र असून ते विज्ञानाचे प्रतिपादन करिते. हे-भोक्ता व भोग्यरूप-जग वस्तुत. उत्पन्न झालेले नसताना ते उत्पन्न झाल्यासारिखे भ्रमाने भासते, असे यात वर्णन केले आहे. याचे श्रवण केल्याने सर्व सृष्टि अतःकरणातच कशी साठविलेली आहे व सोने आणि कडे, जल आणि तरंग, इत्यादिकाप्रमाणे ब्रह्म व सृष्टि याचा सबध कसा आहे, हे चागले समजते चवथ्याचे नाव स्थितिप्रकरण आहे. त्यात तीन सहस्र श्लोक आहेत. प्रपच व त्याचे अधिष्ठान याच्या स्थितीचे वर्णन व कथा याचे त्यात बाहुल्य आहे. ब्रह्मच जगद्रपाने व अहभावरूपाने स्थित आहे, असे प्रतिपादन करण्याचा त्यात मुख्य हेतु आहे पाचव्या उप- शम-प्रकरणाचे पाच सहस्र श्लोक आहेत. हे सुदर प्रकरण युक्तियुक्त व रमणीय आहे. याच्या श्रवणाने चित्त शात होते. कारण, हा जगद्- भ्रम शात कसा होईल, हे यांत चागल्या रीतीने स्पष्ट केले आहे. सर्व रचना काल्पनिक आहे, स्वप्नतुल्य किवा मनोराज्याप्रमाणे आहे, असत् आहे, हा परम सिद्धात या प्रकरणांत व्यक्त केला आहे. साहव्या प्रकरणाचे निर्वाण असे नाव आहे. त्याची ग्रंथसख्या साडे चवदा सहस्र आहे. त्याच्या पटनाने अविद्येचा समूल उच्छेद होतो; सर्व कल्पना शात होतात, मोठे कल्याण होते; चैतन्यात्मा निर्विषय, स्वयप्रकाश, निरुपद्रव, भ्रमशून्य व कृतकृत्य कसा आहे, याचा अनुभव येतो. जग प्रतिबिब आहे, असा निश्चय