पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सग १७. सतत अभ्यास करावा. ह्मणजे कालातराने ते सर्व त्याच्या हातांत येतात; त्यामुळे त्यास सर्व वैभव प्राप्त होते; त्याच्या ठायी सर्व गुण येतात; त्यास सर्व जय मिळतात व तो पूज्य होतो. यास्तव त्यातील एकाचा तरी सतत अभ्यास करावा. प्रयत्नावाचून ही गोष्ट साध्य होणार नाही. करितां दीर्घ प्रयत्न करावा. रामा, प्रयत्नाने वरील गुण सपादन करून घेण्याविषयी जोपर्यंत तूं निश्चय केला नाहीस, तोपर्यंत तुझे वैराग्य निष्फळ आहे. देव, गधर्व, मुनी, मानव यांतील कोणालाही या उपायांवाचून गत्यतर नाही. शमादिकाच्या योगाने सर्व दोष क्षीण होतात. कारण एकादा जरी चागला गुण वाढला तरी त्यामुळे हळु हळु सर्व गुण वाढतात व दोप क्षीण होतात आणि एकादा जरी दोष वाढला तरी तो आपल्या सजातीयास हळु हळु आणितो व विजातीयास घालवितो, असा नियम आहे. चित्तातील मोहवनात वासना नावाची नदी मोठ्या वेगाने वहात असते. शुभ व अशुभ ही तिची दोन तीरे आहेत. प्राणी आपल्या सतत प्रयत्नाने तिला ज्या तीराकडून वाहू देईल त्याप्रमाणे त्याचे कल्याण किवा अकल्याण होईल. यास्तव रामा, प्रयत्न कर. वासनानदीच्या प्रवाहास अशुभ तीराकडे जाऊ देऊ नको. ह्मणजे तुझे थोडेसेही अकल्याण होणार नाही १६. सर्ग १७-या सर्गात, प्रयाची सख्या, प्रकरणे, प्रत्येक प्रकरणाचा विषय इत्यादि- काचे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-राघवा, येथवर मी तुला ज्ञानसाधने व अधिकाऱ्याचे गुण सागितले यात विचार मुख्य आहे. त्यासह वर सागितलेले गुण ज्याच्यामध्ये असतील तोच या पुढच्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकण्यास योग्य आहे. ज्याचे मन व विचार शुद्ध आहेत, तोच या शुद्ध ज्ञानाचे ग्रहण करू शकेल, हे निराळे सागावयास नको. तुझ्या ठायी श्रोत्याचे सर्व गुण आहेत. यास्तव तू ही पुढील ज्ञानसहिता ऐक. ज्याचा पुण्यरूपी कल्पवृक्ष फळास येतो त्यासच हे ज्ञान ऐकण्याची सदिच्छा होते. अतिशय कल्याण होण्याचा प्रसग आल्यावाचून या गोष्ठी रुचत नसतात. म्हणूनच या आत्म्याचे श्रवण करणारे नेहमी थोडे आढळतात या सहितेचे एकदर बत्तीस हजार श्लोक आहेत. मोक्षाचे उपाय सागणे हा हिचा मुख्य उद्देश आहे.