पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ बृहद्योगवासिष्ठसार. ज्ञानाचा उद्भवच होत नाही. ज्याचे मन चितारहित व त्यामुळे व सतुष्ट असते त्या दरिद्री पुरुषासही साम्राज्य-सुख मिळते. सतुष्ट पुरुषाचा व्यव- हार फार शातपणे चालतो. यास्तव, राघवा, तृष्णेचा त्याग करून, या चितामणीचा अंगीकार करावा. राजापुढे सेवक जसे हात जोडून उभे असतात त्याप्रमाणे सतुष्टचित्त पुरुषापुढे सर्व ऋद्धि किकरी होऊन रहा- तात. सिद्ध, गंधर्व व देव, त्याच्याकडे मोठ्या आदराने पहातात व महा- मुनी त्यास पाहून माना डोलवितात. यास्तव तुझ्यासारख्या उत्तम साधकाने सतोषाचा अवश्य स्वीकार करावा १५. सर्ग १६-मोक्षाच्या साधुसमागम नामक चवथ्या द्वाराचे वर्णन करून त्या चार उपायातील एकेकाचे अनुष्टान केले तरी परम फल मिळते, असे येथे सागतात. श्रीवसिष्ठ-आता राहिलेल्या साधुसमागमाचे थोडक्यात वर्णन करितो. तो सर्व अवस्थामध्ये उपकारक आहे. साधुसगनामक वृक्षाचेच विवेक हे पुष्प आहे. व त्यास शम आणि सतोष ही फळे लागतात. या साधु-समागमामुळे मनुष्य मोक्षास पात्र होतो. विद्वजनाच्या समागमामुळे शून्यस्थान परिपूर्ण असल्यासारिखे भासते, मृत्यु मोठा उत्सव वाटतो, व आपत्ति सपत्तीप्रमाणे आवडते. साधुसमागमाच्या योगाने बुद्धि वाढते, अज्ञान हळु हळु क्षीण होऊ लागते, वैराग्य बळावते, व सन्मार्ग दिसू लागतो. यास्तव कष्ट- कारक दशेतही सावुसमागम सोडू नये. साधुसमागम ही एक गगाच आहे. तिच्या पात्रात प्रवेश करून ज्यानीं स्नान केले आहे, त्यास दाने, तपश्चर्या, तीर्थे व यज्ञ काय अधिक देणार आहेत ? निरिच्छ, सशयरहित व हृदयग्रथिशून्य, असे साधु असल्यावर तप व तीर्थे करण्याचे काय प्रयोजन ' ज्याचे मन शात झाले आहे, अशा धन्य साधूचे दर्शन अवश्य घ्यावे. दारिद्र्य, मरण इत्यादिकाच्या योगाने होणारे दुःख सावुसमागमाने नाहीसे होते. जे मूर्ख साधूचा अपमान करितात ते नरकात पडतात व त्यास अनेक असह्य यातना होतात. __ असो, रामा, या ससारसागरातून तरून जाण्यास शम, विचार, सतोप व साधुसमागम हे चारच उपाय आहेत. पण त्या सर्वाचा एकाच वेळी अभ्यास न करिता आल्यास त्यातील एका उपायाचा तरी पुरुषाने