पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६८ बृहद्योगवासिष्ठसार. भूमि, वस्तन्याच्या धारेसारखी अति तीक्ष्ण शव्या कमलाचे कोमल शयन, उन्नत पर्वतप्रदेश व कूपांचा तळ, सूर्यकिरणांनी तापलेल्या शिला व मृदु अंगाच्या ललना, संपत्ति व उग्र भापत्ति, इत्यादि सर्व स्थानीय प्रसंगी तो उद्विग्न किवा हृष्ट होत नाही. भांतून विश्रातिसुखाचा अनुभव घेणारा तो कर्म करीत असतानाही उदासीन असतो. तो नरकातील भय. कर, यातनानाही भीत नाही. कधी व्याकुळ होत नाही व दीन होत नाही. तर पर्वतासारखा सम, स्वस्तचित्त, मौनी व धीर होऊन रहातो. अपवित्र, सपथ्य, विषसिक्त, गोमयादि, नासलेलें, नीरस झालेलें व मिष्ट अन्नही खाऊन तो पचवितो. कडु, गोड, आबट, तिखट, तुरट, इत्यादि रसांनी युक्त असलेली फळे तो एकसारख्याच चित्तवृत्तीने खातो. मद्य, रक्त, रस, दुग्ध व घत याना पाहून तो एक सारखाच हृष्ट होतो. जीविताचे हरण करणारा व ते देणारा या दोघाकडेही तो एकसारख्याच प्रसन्न दृष्टीने पाहतो. सर्व आस्था सोडल्यामुळे, जगस्थिति अस्थिर असल्यामुळे, सर्व ज्ञातव्याचे ज्ञान झाल्यामुळे व चित्त विरक्त बनल्यामुळे साधुपुरुष कोण- न्याही विषयाला केव्हाही अवकाश देत नाही व कोणत्याही इद्रियाला व्हाही कोणत्याही विषयाकडे जाऊ देत नाही. इद्रिय व विषय अज्ञ, अशात व आशाप्रधान पुरुषालाच, कुत्र्यासारखे, तोडीत असतात. संमार- सागरातन वासनातरंगाबरोबर वाहत जाणाराला इद्रियरूपी सुमरी खातात. पण जलीय जसे पर्वताला त्याप्रमाणे विकल्पीव विचारी व शात पुरुषाला हरण करीत नाहीत. सर्व सकल्पाच्या सीमेचाही अंत अशा परमपदी विश्राति घणागला मेरुही तृणासारखा तुन्छ वाटतो. ज्याचे चित्त पूर्ण व आत्माकार झाले आहे, अशा पुरुषाला जगत् व गवताच्या काडीचा तुकडा, विय व अमृत आणि क्षण व कल्पमहम एकसारखेच भासतात. हे सर्व जगत् सविन्मात्र आहे अस जाणून ज्याच्या बुद्धी आनदित झाल्या आहेत असे पुरुष जगाचा मारल्या स्वरूपातच अंतर्भाव करून विहार करितात. सर्वच जर सचिन्मात्र आहे तर त्यांतील इय व उपादेय काय असणार ? याम्ना राघवा, अन्य सर्व भ्रांति सोडून सविन्मात्र हो. जे दिसते ती सर्व संवित्-च होय. कारण उत्पत्तीपूर्वी प नाशानंतर जें नाहीं तें वर्तमानसमयीही नाही. तर यसैमानसमयीं भासणारी सत्ता हा संवित-चा विवर्त माहे, असे जाणन व