पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ९३. जसे नसते त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये त्याला बाधा करण्याचे सामर्थ्य नसते. चवथ्या व पाचव्या भूमिकेत जाण्यास तयार झालेला विवेकी विषय व इंद्रियें या चोराकडून कसा लुटला जाणार ? विषयवेग ज्याची विचारबुद्धि चागली प्रौढ झालेली नसते त्या ( पहिल्या, दुमय व तिसऱ्या भूमिकेंतील) साधकालाच हरण करू शकतात प्रौढ विवे- काला तोडण्यास रागादि कोणताही दुष्ट आशय समर्थ नसतो. चिता त्याला चचल करू शकत नाही. जेव्हा ज्याचे चित्त विचारमय नसते तेव्हा त्याला मृत म्हणतात. यास्तव राघवा, तूं स्वतः आपल्याशीच अथवा सजनांसह हे जगत् म्हणजे काय आहे ? देह काय आहे ? याचा सतत विचार कर. मोहाधकाराचे हरण करणान्या विचाराच्या योगाने ते अमल पद दिसते. प्रकाशरूपी विलास करणाऱ्या सूर्याच्या प्रभावाने अधकार जसा जातो त्याप्रमाणे ज्ञानान्या योगाने सर्व दुःखाचा विनाश होतो व ज्ञेय आपोआप प्रकट होते. शास्त्राच्या विचाराने ब्रह्मतत्व अवगत होते. विचारोत्पन्न आत्मसाक्षात्कार हेच ज्ञान होय. दुवातीठ मावुर्याप्रमाणे, ज्ञेय त्या ज्ञानात असते. याचे ज्ञानाचा प्रकाश ज्याला प्राप्त झाला आहे तो पुरुष ब्रह्मानदप्रचुर असतो. आनदाच्या बुदीत असतो तो कोणत्याही सकटात निमग्न होत नाही तो जीवन्मुक्त, आसक्तिशून्य व राजाधिराजाप्रमाणे पूर्ण. मनोरथ होऊन रहातो ज्ञानवान् वीणा, मुरलि, इत्यादिकाच्या रम्य ध्वनी- मध्ये, कामिनीच्या विषयप्रधान गायनामन्ये, वसतमदाने मत्त झालेल्या भ्रमराच्या घनीमध्ये व अशाच दुसऱ्याही अनेक रम्य व मनोहर पदार्था- मध्ये आसक्त होत नाही. शब्दादि पाची अति चित्ताकर्षक वस्तूविषयी तो सदा अगदी निस्पृह असतो. सुगध, दुर्गव, सुवास, कुवास, गोड, कड, सुरूप, कुरूप, मृदु, कठोर, मजुळ, कर्कश इत्यादि भेदाकडे तो लक्षच देत नाही. उपचनासारख्या आनददायी स्थानी गेल्यास त्याला कधी हर्ष होत नाही व अमेध्य पदार्थानी दूषित झालेल्या स्थानी गेल्यास खेद होत नाही. तापलेले वाळूचे मैदान व हिरवे गवत उगवलेली पुष्पमयी १ लिंगपुराणात याविषयी-सा हाानस्तन्महच्छिद्रं सान्धता सा च मूकता । यत्क्षणं वा मुहूर्त वा शिवमेकं न चिन्तयेत्-असे झटले आहे. याचा अर्थ-एक मुहूर्त किंवा निदान क्षणभरही एका शिवाचे चिंतन न करणे हीच मोठी हानि, तेच मोठे छिद्र, तीच अंधता व मूकता आहे.