पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ९२. ८६५ पण पूर्वीच्या सर्व प्रयत्नांहून हा वासनात्याग कठिण व दुःसाध्य आहे. कारण मन लीन झाल्यावाचून वासनाक्षय होत नाही व वासना क्षीण होईतों चित्त शांत होत नाही. त्याचप्रमाणे तत्त्वविज्ञानावाचून चित्तक्षय कसा होणार ? व चित्तोपशमावाचून तत्त्वविज्ञान कोठचें ? वासनाक्षयावाचूनही तत्त्वबोध सुलभ नाही. येणेप्रमाणे तत्त्वज्ञान, मनोनाश व वासनाक्षय परस्परांचे कारण होऊन दुःसाध्य झाली आहेत. यास्तव, राघवा, विवेकी पुरुषाने प्रयत्नाने भोगेच्छा दूर टाकून या तीन उपायाचा तत अभ्यास करावा. या तीन उत्तम उपायाचा एकाच वेळी वारंवार भ्यास केल्यावाचून तत्त्वसंप्राप्ति होत नाही एकाच वेळी फार दिवस भ्यास केल्यानेच ते फलद होतात. यातील एकेकाचें अनुष्ठान कितीही दिवस जरी करीत राहिले तरी त्यापासून काही लाभ होत नाही. एकेक शिपाई जसा शत्रुसमूहाला जिकू शकत नाही त्याप्रमाणे यातील एकेक उपाय स्वभावाचा पराभव करू शकत नाही. यास्तव याचे सहानुष्ठान करावे, दीर्घ अभ्यासाने दृढ हृदयग्रथीही तुटून जातात. रामा, शेकडो जन्मी या ससारस्थितीचा अभ्यास केलेला असल्यामुळे दीर्घकाल दृढ भ्यास केल्यावाचून तिचा नाश होत नाही. यास्तव तू जाता, येतां, — सत्ता, उठता, ऐकताना, वास घेताना, हातरुणावर पडता पडता, परम. पोल्याणाकरिता, या तीन उपायाचा अभ्यास कर. वासनात्यागाला प्राण- निरोधाचीही गरज आहे. यास्तव प्राणायामही करावे. म्हणजे चित्त अचित्त होते. प्राणायामाचा फार दिवस केलेला अभ्यास, गुरूनी कृपा करून सागितलेली युक्ति, आसन, व मित भोजन याच्या योगाने प्राणांचा निरोध होतो आणि यथार्थज्ञानाने वामनाप्रवृत्त होत नाही. (हे वरही सागितलेच आहे ) प्रथम प्राणस्पदाला जिंकण्याविषयी प्रयत्न करावा. थवा या हठयोगाला सोडून राजयोगाचा अभ्यास करावा. (म्हणजे एकां- तात बसून चित्ताला वारंवार विषयविमुख करीत रहावे.) असे केल्याने पुष्कळ दिवसांनी ते पद प्राप्त होईल. अंकुशावाचून मत्त व दुष्टगज जसा "श होत नाही त्याप्रमाणे अध्यात्मविद्या, साधुसमागम, वासनात्याग व पाणस्पदनिरोध या उत्तम उपायावाचून चित्त अधीन होत नाही. चित्त- जयाविषयी याच पुष्ट युक्ती आहेत. पण या असल्या उत्तम व सुलभ युक्ती असताना त्याचा अव्हेर करून जे हठाने चित्ताचे नियमन करूं