पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. भाव प्रकट होतात. जगत्सघ त्या परमात्म्यापासूनच होतात. त्याच्याच आधाराने रमतात; वाढतात; परिणाम पावतात; क्षयोन्मुख होतात व शेवटी गळून जातात. तो परमात्मा सर्व गुरूंहून गुरु व लवूहून लघु, सर्व स्थूलाहून स्थूल, सूक्ष्माहून सूक्ष्म, दूराहून दूर, अगदी जवळ, अगदीच अल्प, सर्वांहून वडील, सर्व तेजाचें तेज, तमांचे तम व वस्तूं- तील साररूप वस्तु आहे. ते परम तत्त्व वर्णन करून सागतां येण्या- सारखे नाही. यास्तव रामा, सर्व प्रयत्नाने त्या पावन पदी प्रतिष्ठित होशील, असें कर. म्हणजे तुला परम शाति होशील ९१. सर्ग ९२--पूर्वोक्त स्थितीप्रमाणे यन्नगौरव व लाघव. वासनादिक्षय व ज्ञान पाचा एकाच काळी अभ्यास. श्रीराम-गुरुवर्य, आपण ही चित्तबीजे सागितलीत. पण आत कोणत्या उपायाने ते पद शीघ्र प्राप्त होते ते सागा! श्रीवसिष्ठ-राघवा, या दुःख बीजाच्या वर्णनाबरोबरच त्याचे उपायही मी सुचविले आहेत. त्याचा उपयोग केला असता तें पद शीघ्र प्राप्त होते. तु स्वप्रयत्नाने वासना टाकून सत्तासामान्याच्या पराकाष्ठारूप परानदान जर क्षणभरही स्थिर झालास तर त्या क्षणात तुं त्या पदालाच पोचला आहेस, असे समज. परंतु असें करिता येणे शक्य नसल्यास शोधित जगत्कारण-तत्त्वात स्थिर स्थिति कर. म्हणजे थोड्या अधिक प्रयत्नानें तू त्या पदास प्राप्त होशील. हे निष्पापा, शोधित त्वपदार्थामध्ये जर त यानाने स्थिर होशील तर बराच यत्न केल्यावाचून तुला ते पद मिळणार नाही. केवळ विषयाचेच ध्यान करावे म्हणून म्हणशील तर तें संभवत नाही. कारण कोणतेही स्फुरण सचित् वाचून होतच नस- ल्यामुळे नुस्त्या विषयाचे दर्शनच अशक्य आहे. तूं काही कर, कोठेही जा, कशाचेही चिंतन कर, किंवा आणखी कोणतेही कायिक, वाचिक व मानसिक कृत्य कर तरी त्यातील प्रत्येक क्रियेमध्ये संवित् पाचून सर्व असत् आहे. घटाची सवित नाही तर घटही नाही; सूर्याचे भान नाही तर तो दीप्त नारायणही नाहीच. असा प्रकार असल्यामुळे, शूरा, वासनात्याग कर. जिचा त्याग करिता येणे सर्वथा अशक्य आहे, त्या संवित्-मध्येच स्थिर होऊन रहा, म्हणजे तुझी सर्व शारीरिक व मानसिक दुःखें नाहीशी होतील.