पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सर्ग १५. यास्तव विचार करावा. मी कोण ? व हा संसार कोणाचा ? असा विचार, कुटुंबभरणादिकाकरिता व्यवहार करीत असतांनाही, श्रवणादिद्वारा करावा. व्यवहारातही विचाराने अनेक कामे कशी होतात, हे सवास ठाऊकच आहे. कमेकाड व ज्ञानकाड याच्या, क्रमाने, वर्म व ब्रह्मतत्त्व या सिद्धातस्थिति आहेत व त्या विचारानेच ज्ञात होतात. नेत्रहीन पुरुषास अध ह्मणण्यापेक्षा विवेकहीनास अध मणणच युक्त आहे. अनेक प्रकारच्या रोगानी जर्जर झालेल्या पुरुषास जितके दुःख होते, त्याच्या सहस्रपट दुःख अविवेक्यास होणार, असे समजावे. कारण रोग्याचे दुःख शरीरात प्राण असेपर्यतच त्याच्या अनुभवास येणार, हे उघड आहे. पण अविवेक्याचे दु ग्व अनेक कल्पानीही सपणे शक्य नाही. यास्तव विवेकी सत-चिख- लात बेड़क होऊन रहाणे, विष्ठेत जत होऊन लुवलुवणे व गुहेत सर्प होऊन पडणेही पतकरेल, पण मनुष्य होऊन अविवेकी रहाण पतकरणार नाही, असे सतत ह्मणत अमतात. विचाराच्या योगानेच तत्त्वज्ञान होते. नत्त्वज्ञानाने चित्त शात होते व चित्ताच्या शातीने सर्व दुःखाचा क्षय होतो. यास्तव, बा रामा, असे उत्तम फल देणारा हा विचार तुला आवडो व तो करण्याची सद्वद्धि तुला होवो १४. वर्ग १५---कल्पवृक्षाच्या छापेप्रमाणे अतिशय सुखशीतल असलेल्या मोक्षाच्या संतोष नामक तृतीय द्वाराचे येथे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-मोक्षाचा तिसरा द्वारपाल सतोप आहे. त्याच्या सारखे दु परे कल्याण नाही सतुष्ट पुरुषास श्रेष्ठ विश्राति मिळते. स्याना साम्राज्यही तृणासारिखे तुच्छ वाटते. रामा, सतोपाने भूषित झालेली बुद्धि ससारातील कठिण प्रसगीही उद्विग्न होत नाही. मतापरूपी अमृत पिऊन जे तृप्त होतात त्यास ही विपुल भोगश्री विषा- सारखी वाटते. मला वाटते की, अमृताच्या धाराही प्राण्यास सतोषाप्रमाणे समाधान देणार नाहीत. जे प्राप्त नसेल त्याच्या विषयीची वाछा सोडून व जे प्राप्त होईल त्याच्याविषयीही उदास राहून, आनंदात काल घालविणे, हे सतोषाचे लक्षण आहे. आत्म्यामध्येच प्रसन्न होऊन रहाण्याची सवय मनास जोपर्यत लागलेली नसते तोपर्यतच सर्व आपत्ती व सर्व दुःखे अनुभवास येतात. संतोषामुळे शीतळ झालेले चित्त शुद्ध विज्ञानाच्या योगाने विस्तृत होते. पण आशाच्या योगाने अस्थिर व संतोषशून्य चित्तात