पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ९१. ८६३ वीरा, तूं दृश्यदर्शनाचा त्याग कर व अजड आणि पूर्णानद हो. तू अवि- पय व प्रबुद्धात्मा आहेस. आस्थारहित, पदार्थास सत्य न समजणारा, केवल भात्मपरायण, निर्विकल्पसमाधीच्या योगानें वासनात्याग करणारा, सर्वत्र सम व कल्पनारहित पुरुषच अजड व पूर्णानद होऊ शकतो. आत्माच आपल्या अनादि मायेच्या योगाने सर्व जगत्-वेष घेतो. कोशकार किड्याप्रमाणे आपल्यालाच बाधून घेऊन व पुष्कळ दुःख भोगून हा फार दिवसानी सवित्स्वभावामुळे आपोआप केवलतेस प्राप्त होतो. आकाश, पृथ्वी, वायु, अतरिक्ष, पर्वत, नद्या, दिशा, इत्यादि या सर्व सवित्-जलाच्याच लहरी आहेत. सर्व जग सविन्मात्र आहे. दुसरी कल्पनाच नाही. म्पंद, कप, संवेदन इत्यादि सर्व बंद होऊन सवित् जेव्हा स्वरूपात स्थिर होते तेव्हा यथार्थ आत्मज्ञान होते. पण रामा, ही अंतःकरणात प्रतिबिबित झालेली सवित् असून तिची बीजभूत सन्मात्ररूप ब्रह्मसवित् निराळीच आहे. कारण ही प्रति- बिब-सवित् बिबभूत संविनमात्र ब्रह्मसवित्-पासून उदय पावते. सत्तेची दोन रूपे आहेत. एक नाना आकारानी व्यवस्थित व दुसरें एकरूप. घटता, पटता, त्वत्ता, मत्ता इत्यादि विभाग नानारूप सत्तेमुळे होतात व या विभागावाचून जी सामान्य सत्ता ती एकरूप सत्ता आहे. सर्व विशेषशून्य, सन्मात्र व निर्लेप असे जे सत्तेचे एक महारूप तेच ब्रह्म- पद होय. नानारूप व्यावहारिक सत्ता खरी नव्हे. कारण तिचे घटादि विषय सत्य नाहीत. पण सत्तेचे जे विमल एकरूप ते कधीही नाश पावत नसल्यामुळे व त्याची विस्मतिही होत नसल्यामुळे सत्य आहे यास्तव कालसत्ता, कलासत्ता, वस्तुसत्ता इत्यादि विभागकल्पना सोडून तू केवल सन्मात्रपरायण हो. सत्ताचा विभाग करणे अगदी उचित नव्हे कारण विभाग भेदभावाला उत्पन्न करणारा आहे. भेददृष्टि नेहमीच अपवित्र आहे. एवढ्यासाठी, प्रिय रामा, तू सत्तासामान्याची भावना कर व परि- पूर्ण परानन्दी हो. सत्तासामान्याचे काही एक बीज नाही. ते अनादि- अनत आहे. असल्या सामान्यसत्तेमध्ये लीन होऊन जो तेथें निर्विकार रहातो तो पुनः दुःखात पडत नाही. तें शुद्ध सत्त्व सर्व कारणाचे कारण आहे. त्या विस्तीर्ण चित्-आरशात समस्त वस्तुदृष्टी प्रतिबिंबित होतात. जिहेमध्ये जसे षड्स व्यक्त होतात त्याप्रमाणे आत्मसंवित्-मध्ये हे सर्व