पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ९१. ८६१ आहे आणि असा प्रकार असल्यामुळे वासनानाशाने चितुला स्वास्थ्य- रूप मुक्ति मिळते. वासनाभावी मन सतत मननरहित झाले म्हणजे परम-उपशम देणारी अमनस्ता उदय पावते. सवित्तीत काही स्फुरत नाहींसें झाले म्हणजे चित्त उत्पन्न होत नाही. जगातील सर्व वस्तूच्या भावाची भावना सोडली म्हणजे शून्य हृदयाकाशात चित्त कसे उत्पन्न होणार ? कारण कोणत्याही वस्तूची मनात सत्यरूपानें व प्रियरूपाने भावना करणे हैं एवढेच चित्ताचे रूप आहे, असे मी जाणतो. तेव्हा दृश्य मुळीच कल्पनायोग्य नाही, असे समजणाऱ्या हृदयाकाशात ते कसे उद्भवणार ? ___ आता अचित्तता म्हणजे काय तेंही सागतो. बाह्य विषयाचे स्मरण न करिता परमार्थ वस्तुस्वरूप पहाणे हेच अचित्तत्व होय. जीवन्मुक्त आतून सर्व आस्था सोडून व स्वरूपाचे सतत अनुसंधान करून शात मनाने प्रारब्धप्राप्त व्यवहार करीत असतात. यास्तव त्याचे चित्तही अचित्तच होय. कारण जळलेल्या वस्त्राच्या राखेप्रमाणे अवशिष्ट राहिलेले तें शुद्ध सत्त्वरूप असते. वासनाप्रयुक्त विषयरस नसणे हेच चित्ताचे भचित्तत्व होय. जीवन्मुक्त वासनारसहीन असतात, हे मी वर सागितलेंच आहे. तात्पर्य रामा, प्राणस्पद व वासना या दोन चित्तर्बाजांतील एक क्षीण झाले म्हणजे दुसरे अवश्य नाश पावतें तिळातील तेलाप्रमाणे ही दोन बीजे एकमेकान्या आत असतात व बीजाकुर-न्यायाने एकमेकास कारण होतात. एकटी यासनाच पुनर्जन्माला कारण होत नाही, तर ती स्पंदासह अनर्थकारिणी होते. याचप्रमाणे चित्तही त्या उभयताचे व विषयजन्य सुखदुःखाचे कारण आहे. सविद्रूप चित्त प्रथम प्राण, मग इंद्रिये, मग इंद्रियजन्य भानंद इत्यादि सर्व क्रमाने उत्पन्न करूं शकते. त्याचप्रमाणे पूर्वी उपभोग घेतलेल्या विषयाचा आनंद व तात्कालिक जीवनलक्षण वायुस्पद हेही वासनारूपाने चित्तोत्पादक होतात. (म्हणजे जेव्हा आनंद व वायु वासनात्मक होतात तेव्हा ते दोघे मिळून चित्ताला उत्पन्न करूं शकतात). याप्रमाणे ती तिन्ही परस्परांच्या आश्रयाने रहाणारी व परस्परास कारण होणारी आहेत. विशेषतः प्राणस्पद व वासना तरी, वास व पुष्प, तेल व तिळ याप्रमाणे, परस्पराश्रय असतातच व अशा नित्य सबचानेच ती दो चित्तांकुरांची बीजे होतात. वासनेने प्रेरिलेला प्राणस्पंद संवितमध्ये क्षोभ उत्पन करून चित्ताला जागें कारतो. प्राण स्वतः स्पंदधर्मी असल्यामुळे रागादि वास-