पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६० बृहद्योगवासिष्ठसार. सवित्च देहामध्ये स्फुरण पावते. अति सूक्ष्म संवित्-ला जागे करणारा प्राणस्पद आहे. रामा, सवित्-ला विक्षिप्त न होऊ देणे यांत परम कल्याण आहे. तिच्या क्षोभाचे कारण, असा जो प्राणस्पंद त्याचा प्राणायामाच्या अभ्यासाने नाश केला ह्मणजे संविरक्षोभ होत नाही. सवित्चा चित्ताका- राने समुद्भव झाल्यास कोणता दोष आहे ? म्हणून म्हणशील तर सांगतो. चित्ताकार झालेली सवित् बाह्य विषयाकडे मोठ्या प्रेमाने जाते. नंतर त्याच्या उपभोगाची इच्छा होऊन अनत दुःखे उद्भवतात. पण ज्यावेळी सवित् बाह्य विषयाविषयी निजत्यासारखी होऊन आतर आत्म्याच्या बोधास उद्युक्त होते तेव्हा तिला ते अवश्य हचव्य पद प्राप्त होते. यास्तव राघवा, प्राणपरिस्पंद व प्रेमातिशयाने वासनाचा उद्भव याच्या योगाने सवित्ला मूढ जर न करशील तर तू अज( विकारशून्य, मुक्त )च होस सवित्-चें मौढ्य हेच चित्त असून त्याने हे सर्व अनर्थजाल विस्तारले आहे प्राणायाम, ध्यान, व मितभोजनादि दुसरे उपाय याच्या योगाने योगी चित्तशात्यर्थ प्राणनिरोध करितात. प्राणाचा सरोध चित्तोपशातिरूप फळ देतो; परम समतेस कारण होतो व सवित-ला सुंदर स्वास्थ्य देतो. रामा, ज्ञानी पुरुषानी अनुभव घेऊन सागितलेली व वासनामळे जिवंत झालेली चित्ताची दुसरी उत्पत्ति ऐक. अगोदर मी तुला वासनेचे स्वरूप मागतो. पूर्वीच्या दृढ भावनेमुळे देहादि पदार्थाचे अह, मम इन्यादि सम्झाररूपान पूर्वापर विचारावाचूनच ग्रहण करण यालाच वासना म्हण- तात. पूर्वापर विचार करणान्या जीवन्मुक्ताचे ठायीं देहादि संस्कारच नसतो. शिवाय वासनेच्या विरुद्ध असलेल्या विचारान्या योगाने त्याना 'मी देह आहे' अमें केव्हाही वाटत नाही. अज्ञाची स्थिति याहून भिन्न असते. त्याच्या ठायी वासनाविरोधी विचार नसतो. त्यामुळे तीव्रसवेगाने केलेल्या भावनादाामुळे तो देहादिरूप होऊन जातो. वासनापरवश झालेला अविचारी पुरुष में पाहतो तंच सत्य आहे असें जाणून मोहित होतो. मत्त पुरुषाप्रमाणे दुर्दृष्टि पुरुष वासनावशात् स्वरूपाचा त्याग करून सर्व भ्रात जगत् पहातो. तो अतःस्थ वासनेमुळे मानसिक पीडा- युक्त होतो अनाम्याला भात्मा समजणे हे भयथार्थ ज्ञान आहे. भवस्तूला वस्तु समजणे हेच चित्तत्त्व होय. दृढ अभ्यासाने पदार्थचिंतन केल्यामुळे अनि चचल चित्त उत्पन्न होते. तेच जन्म, जरा व मरण याचे कारण