पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ९१. ८५९ वासनानी युक्त असलेल मन मंत्र्यादि गुणानी परिपूर्ण होते. हे निष्पापा, पुनर्जन्मरहित मन जीवन्मुक्ताचे ठायींच आढळतें. हाच सरूप मनोनाश होय, जीवन्मक्ताच्या या मनोनाशान मैयादि उत्कृष्ट गुण चंद्रांतील किरणांप्रमाणे सदा स्थित असतात. ___ अरूप मनोनाश विदहमक्ताचे ठायींच असतो. त्यावेळी सर्वश्रेष्ठ गुणाचे आधारभूत सत्त्वही विदेहमुक्तान्या परम पावन पदीं लीन होते. त्यानतर त्या चित्तात गुण, अगुण, श्री, अश्री, लोलता, स्थिरता, उदय, अस्त, हर्ष, क्रोध इत्यादि काही रहात नाही. तेज, तम, सध्या, दिन, रात्र, दिशा अवकाश, वासना, रचना, इत्यादिकाचा त्यात गवमुद्धा नसतो. जे बुद्धीच्या पार गेले आहेत त्याचे ते विस्तीर्ण आम्पद आहे. विदेहमक्त प्रातिमासिक चित्त-लवशून्य होऊन परमपदीं लीन होतात ९०. सर्ग ९१ - ससारवलीचे वीज शरीर, शरीराचें मन आणि मनाचे वासना व प्राणस्पद श्रीराम-भगवन् , या अपार संसारसागराचे बीज काय आहे ? त्या बीजाचे बीज काय आहे व त्याचे बीज काय आहे, हे सर्व माझ्या बोच- वृद्धीकरिता योडक्यात सागा. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, शुभाशुभ महा-अकुगनी युक्त असलेल्या या ससारलतेचे बीज शरीर आहे ही वेल शरीरापासूनच वाढते. आशा- वश होणारे चित्त शरीराचे बीज आहे. ते दु.खरन्नाचे सपुट व भावाभाव- दशाचा कोश आहे. शरीरे त्याच्यापासून उद्भवतात. चित्ताच्या संकल्पामुळे भव्य आकार कसा निर्माण होतो ते आह्मी उत्पत्ति-प्रकरणात सविस्तर सागितलेच आहे मृत्तिकेचा जसा घटादि विकार त्याप्रमणे जगात जेवढे म्हणून हे दृश्य आह तो सर्व चित्ताचा विकार होय चित्तवृक्षाची दोन बीजे आहेत. एक प्राणस्पद व दुसरे दृढभावना. जेव्हा नाड्याना स्पर्श करण्यास तयार झालेला प्राण प्रस्पद करूं लागतो तेव्हा चैतन्य-विकाररूप चित्त तत्काल उत्पन होते. पण शिरामार्गातून प्राण जेव्हा संचार करीत नाही तेव्हा बाह्य संवेदनाचे सस्कार जागे होत नसल्यामुळे आत, पित्तही उत्पन्न होत नाही. आपल्या या चित्तस्पद-दृष्टांतावरून, हिरण्यगर्भाच्या चित् पासून जगदाकार होणे, हाही समष्टि-प्राणान्या संदाचाच परिणाम आहे, असे कळते. प्राण- स्पदाचा उपराम हीच खरी शांति आहे. कारण प्राणस्पंदाने जाग्रत् केलेली