पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५८ बृहद्योगवासिष्ठसार. सर्ग ९०-दोन प्रकारचा चित्तनाश श्रीवसिष्ठ-ज्या वेळी वीसहव्याचे चित्त प्रायः विचाराने अस्त पात्र- ल्यासारखे झाले तेव्हा त्याच्यामध्ये मैव्यादि गुण उत्पन्न झाले. श्रीरामपण गुरुवर्य, विचाराच्या उत्कर्षामुळे चित्तस्वरूप लीन झाले असता मैत्र्यादि गुण उद्भवणार कसे ? चित्त ब्रह्मामध्ये तादात्म्य पावल्या- वर ते कोठे स्फुरणार ? श्रीवसि.-रामा, चित्ताचा नाश सरूप व अरूप असा दोन प्रकार- चा आहे. जीवन्मुक्ताच्या चित्ताचा सरूप नाश होतो व विदेहमुक्ताचें चित्त अरूप नाश पावते. चित्ताची सत्ता दुग्वाला कारण होते व चित्त- नाश सुख देतो. यास्तव चित्तसत्तेचा क्षय करावा. तामस वासना- जालानी व्याप्त असलेले जें जन्मकारण मन तेंच विद्यमान मन असून ने केवल दुखालाच कारण होते. प्राक्तन गणसंभारास ( देहादिकास ) हैं माझे, असें जाणणे हेच मनाचे सत्त्व व दुःखबीज आहे. मन विद्यमान असेपर्यत दुःग्वक्षय कोठून होणार ? मनाचा अस्त झाला की प्राण्याचा ससारही अम्त पावतो. प्राण्यामध्ये वासनाकुरानी दृढ झालेले विद्यमान मन दुःख-वृक्षाचें मूळ असून त्यापासून दुःख वृक्षाचे वन पसरते. श्रीराम-हे ब्रह्मन् , कोणाचें मन नष्ट असते ? तें कमें नष्ट होने व नाश पावलेल्या मनाची सत्ता कशी असते ।। श्रीवसिष्ठ-ज्या धीराला मुखदुःखदशा साम्यापासून च्युत करू शकत नाहीत त्याचे चित्त मृत आहे, असें ममजतात. हा मी व हा मी नव्हे, ही चिना ज्या श्रेष्ठ नरास देहरूप करीत नाही त्याचे मन नष्ट झाले आहे, असे जाणाव. आपत्ति, कृपणता, उत्साह, मद, माद्य, महा मत्र इत्यादि इष्टानिष्ट भाव ज्याच्या मुखचर्येत बदल करीत नाहीत त्याचे मन नष्ट होय. हे साधो, हा मनोनाश होय. यालाच नष्ट मन म्हणतात. ही चित्तनाश-दशा जीव-मक्तामध्ये आढळते. दृश्य सत्य आहे या भ्रातीने त्याच्याविषयी मनन करण्याची योग्यता अमणे हीच मूढता असून जेव्हा नी नष्ट होते तेव्हा चित्तनाश नावाचे सत्व उदय पावते. जीवन्मुक्तान्या स्वभावभूत अशा त्या सत्त्वविलासाला कोणी चित्त म्हणतात. ते उत्तम भाताच्या गोट्यास वाहि म्हणतात पण तुष गेले की तोच तादुळ होतो. त्याप्रमाणे पाशबद्ध जीव व पाशमक्त सदाशिव होय.