पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ८९. वीतहव्याच्या पुर्यष्टकानें तत्त्वबोध व समाधि याच्यायोगाने अविषमरूपास पोचविलेल्या पृथ्वी-जल-तेजो वाय्वादिरूप सवित्तीच्या द्वारा त्याच्या शरीरा- सही ब्रह्मरूप करून सोडले होते. त्यामुळे तिला काही विकार झाला नाही. याविषयी आणखी एक युक्ति सागतों तीही ऐक. स्पंद हे नाशाचें कारण आहे व कोणताही विकार, चित्तजन्य अथवा वायुजन्य असतो, हेही लोकव्यवहारात प्रसिद्ध आहे. म्पंद हेच प्राण्याचे प्राणन आहे. ते शात होताच धारणेच्या योगाने योग्याचे प्राण देहामध्ये पाषाणासारखे दृढ होऊन रहातात. त्यामुळे त्याची तनु नष्ट होत नाही. ज्याचा चित्तजन्य किंवा वातजन्य स्पद सबाह्याभ्यतर नसतो त्याची वृद्धि व क्षय होत नाही. बा तत्त्वज्ञा, बाह्य व आतर स्पद शात झाला म्हणजे त्वगादि धातू देहातील पूस्थिति सोडीत नाहीत. देहस्पद अगदी शात झाला म्हणजे अडवून ठेवलेले प्राण मेरूसारखे स्थिर होतात. लोकामध्ये या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव येतो स्पंदाच्या अभावी शवाची अगे काष्ठासारखी ताठून जातात. असो; यास्तव योग्याची शरीरे जगात कितीही वर्षे जरी राहिली तरी भूमीतील शिळाप्रमाणे किवा मेघाप्रमाणे फुटत किवा कुजत नाहीत. आता वीतहव्य त्याचवेळी शात का झाला नाही व देह सोडून का गेला नाही, तें सागतो. जे ज्ञानी, वीतराग, हृदयप्रथिशून्य असतात ते सर्व स्वतत्रपणे शरीरात रहातात. प्राक्तनकर्मफल देण्यास तयार झालेला ईश्वर किंवा कर्मच प्रधान आहे, असे म्हणणान्या मीमामकाच्या मती कमें त्याच्या प्रारब्धशेष भोगावयास प्रवृत्त झालेल्या चित्ताचे नियमन करूं शकत नाहीत. त्याला अन्यथा प्रवृत्त करण्यास ती समर्थ नसतात. त्या- मुळे बा राजपुत्रा, तत्त्ववेत्त्याचे मन आकस्मिक प्रारब्धप्राप्त जीवन किवा मरण यातील ज्याची ज्याची भावना करते ते तें तत्काल होते. या न्यायार्ने वीतहव्याच्या मनाने प्रारब्धप्राप्त जीविताची भावना केली व त्याप्रमाणे ते झाले. पण प्ररब्ध संपताच जेव्हा त्याची संवित विदेहमुक्तीची भावना करूं लागली तेव्हा तो विदेहमुक्त झाला. वासनापाशरहित झालेले त्याचे मन वास्तव भामभावाने उदय पावलें व मन हीच ज्याची उपाधि आहे, असा जीव स्वयं सकल शक्तिमय शिव झाला ८९. १ याविषयी एका तत्त्वज्ञाने असें झटले आहे तुषेण बद्धा व्रीहि. स्यात्तुपाभावे तु तण्डुल । पाशबद्धः सदा जावः पाशमुक्त सदा शिव. ॥ याचा साराश-तुषयक्त