पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५६ बृहद्योगवासिष्ठसार असल्यामुळे त्याच्याठायीं इन्छा संभवत नाही. इच्छेच्या अभावी तो त्याविषयी प्रयत्न करीत नाही. प्रयत्नच जर नाही तर फळ कोठचें ? आत्मज्ञानेच्छ वीतहव्यलाही इच्छा व प्रयत्न याच्या अभावी सिद्धी प्राप्त झाल्या नाहीत. श्रीराम-प्रभो, सिद्धी ही इच्छामूलक प्रयत्नवृक्षाची फळे आहेत हे मला कळलें व आत्मज्ञाच्या ठायीं त्याचा असंभव कसा आहे, तेही माझ्या ध्यानात आले. पण त्या मुनीच्या मृत शरीराला क्रव्याद पशुंनी कसें खालें नाही ? व भूप्रवेशसमयींच तो तत्काल विदेह मुक्त कसा झाला, ते मला सागा ? श्रीवसिष्ठ-रामा, जी अज्ञसवित् रागादि दोषानी दूषित झालेल्या देहाहभाववासनाततूने वेष्टित झालेली असते तीच देहाच्या च्छेद-भेदादि. कामुळे सुख-दुःखादिभाक् होते. पण जी सवित् अति शुद्ध व सविन्मात्र- मयी असते तिच्या सबधी शरीरास तोडण्यास कोणीही कधी समर्थ नाही. योगी कोणत्या युक्तीने शेकडो वर्षे लोटली तरी अक्षय शरीराने युक्त असतो तें व त्याला च्छेदादि भ्रम कसे परवश करू शकत नाहीत तें सांगतो. चित्त ज्या ज्या पदार्थात जेव्हा जेव्हा पडते तेव्हा तेव्हा तें तत्काल तसें होतें. ते शत्रूला पाहताच द्वेषादि विकारयुक्त होते व मित्राला पहाताच आनदपूर्ण बनते. रागद्वेषशून्य उदासीन पुरुष, पर्वत, वक्ष इत्यादिकाकडे पाहून कधी कोणाला राग-द्वेष वाटत नाही, हेही सर्वांच्या अनुभवानेच सिद्ध आहे. मन स्वादिष्ट अन्ना• मध्ये आसक्त होते, नीरस पदार्थाविषयीं निःस्पृह असते; कडु पदार्थ त्याला अगदी आवडत नाहीत, असा अनुभव येतो. रागद्वेष वैषम्य. शून्य सविद्विलासाने सपन्न असलेल्या योग्याच्या देहामध्ये जेव्हा हिर प्राण्याचे चित्त पडते तेव्हा तत्काल योगिसवित प्रतिबिंबित शाल्याप्रमाणेच तें समतेम प्राप्त होते. त्यामुळे समदर्शी यतीच्या सानिध्या द्वेषादिरहित झालेल्या हिंस्रप्राण्याच्याही चित्तात त्याच्या शरीरास तोडा व खावे, असे वाटत नाही. पण तेच हिंस्र प्राणी योगिशरीरापासून दूर गेले म्हणजे त्यांना जो पदार्थ दिसेल त्याप्रमाणे त्यांची वृत्ति होते. या कारणाने सिंह, व्याघ, किडे, साप इत्यादिकातील कोणीही वीतहव्याच्या शरीरास स्पर्श केला नाही. संवित् सत्तासामान्यरूपाने काष्ठ, लोष्ट, पाषाण इत्यादि सर्व पदार्थांमध्ये असते. पण ती पुयष्टकामध्येच व्यक्त होते. ज्यांचे चित्त समाहित नसते त्यांना ती अनेक पदार्थांच्या योगाने विषम व मर्यादित आहेशी दिसते.