Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ८९. गामी आत्म्याला सुख दु खाचा लेप होत नाही. पुष्कळ ज्ञानी या भूतळावर विहार करितात. पण तुझ्याप्रमाणे कोणी दुःखवश होत नाहीत. तू स्वस्थ हो, उदार हो, सम व सुखी हो तू सर्वग आहेस, तू आत्मा आहेस व तुला पुनर्जन्म नाही. तुझ्यासारखे जीवन्मुक्त होमर्प विकाराना वश होत नाहीत. श्रीराम-गुरुवर्य, याच प्रसगाने मला एक सशय आला आहे. तेवढा तो घाल्या जीवन्मुक्तान्या शरीरात आकाशगमनादि शक्ति का दिमत नाहीत ? श्रीवसिष्ठ-रामा, आकाशगमनादि क्रिया ह्या पदार्थाच्या सहज शक्ती आहेत. अग्नीच्या ऊर्वज्वलनाप्रमाणे त्या देवादिकामध्ये स्वाभाविकपणेच सिद्ध असतात आत्मज्ञ त्याची फारशी अपेक्षा करीत नाहीत. अनात्मज्ञ मानवास मणि, औषधी इत्यादि द्रव्यशक्ति, योगाभ्यासादि क्रियाशक्ति, व परिपाक काल-शक्ति यान्या योगाने त्या केव्हा केव्हा प्राप्त होतात. पण तो भात्मज्ञानरन्तिाचा विषय आहे, आत्मज्ञाचा नव्हे कारण ते स्वयं आत्मा झालेले असतात. आत्म्याच्या योगाने आत्म्यामध्ये तृप्त होतात. जगद्भाव अविद्यामय आहेत. असा त्याचा निश्चय असतो. तेव्हा ते अविद्याशून्य आत्मज्ञ न्यात निमग्न कसे होणार? जे अविद्येलाही युक्तीने सुखरूप करितात ते अविद्यामयच होत आत्मज्ञ अविद्येला सुखस्वरूप समजत नाहीत. ते निष्काम असतात ते आत्म्यामध्येच सतुष्ट असतात. आकाशगतीचा त्याना काही उपयोग नसतो. सिद्धि, भोग, भाव मान, मरण, जीवित, याच्या योगाने त्याचे काही इष्ट होत नाही. ते नित्य तृप्त व शात असतात. यहन्छेनें प्राप्त झालेल्या सुखःदुख-जीवित भरण इत्यादिकाच्या योगाने ते सदा तृप्तच असतात. त्याना कृत, अकृत इन्यादिकाच्या योगाने काही प्राप्त करून ध्यावयाचे नसते. सिद्धी मत्र, औषधी इत्यादि उपायानी साध्य होतात. अमुक उपायाने अमुक सिद्धि मिळावी हा नियतीचा क्रम आहे. त्यात बदल करण्याचे सामर्थ्य शंकरादि नियति-कल्सही नाही. विष, मदा, अग्नि इत्यादि वस्तूमध्ये मारणे, मोह पाडणे, जाळणे हे स्वाभाविक धर्म आहेत. ते नियतीमुळेच त्याच्या मध्ये नियत आहेत. त्याप्रमाणेच सिद्धिही द्रव्य-देश-क्रिया याचा स्वभाव आहे. वस्तु-स्वभावामध्ये अनात्मज्ञच रत असतात. आत्मज्ञ त्यात रत होत नाहीत. परमात्मप्राप्ति झाली म्हणजे त्या सिद्धी फारशा उपकारक वाटत नाहीत. ज्याला इच्छा असते तोच त्याचीही इच्छा करणार, हे उघड आहे. आत्मज्ञ निरिन्छ असतो. तो पूर्णचित्त