पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ बृहद्योगवासिष्ठसार. पहिले विचार भाग्यवानास आपोआप सुचतात. तरी पण आपला अनुभव दृढ करण्याकरितां त्यानीं गुरु व शास्त्र याचे सहाय घ्यावे; व शेवटचे विचार गुरु व शास्त्र याच्या वाचून होतच नाहीत. यास्तव विचार कर- ण्याकरिता गुरूस शरण जावें. विचाराच्या योगाने बुद्धि सूक्ष्मतत्त्वात प्रवेश करण्यास समर्थ होते. ससाराख्य दीर्घ रोगाचे, विचार हेच औषध आहे. चित्तसमाधान (शम) हे सर्व दुःखांतून पार जाण्याचे साधन आहे खरे; पण मोह समाधानास आच्छादित करून सोडीत असतो. यास्तव विचार करावा. विचाराच्या योगाने मोह जातो. सत्पुरुषांस विचारावाचून दुसरा उपाय मुचत नाही. विचाराच्या योगाने अशुभाची निवृत्ति व शुभप्राप्ति होते. बल, बुद्धि, तेज, प्रसगानुरूप स्फूर्ति, कर्मानुष्ठान व त्याचे फल ही सर्व विचाराने सिद्ध होतात. युक्त व अयुक्त यास व्यक्त करणारा विचार हा एक मोठा प्रदीप आहे. तो इष्ट वस्तूचा लाभ करून देतो. असल्या या श्रेष्ठ व प्रचड विचाराचा आश्रय करून ससारसागरातून तरून जावे. याच्या योगाने मूढही कालातराने परमपदी लीन होतात. राज्य, सपत्ति, विपुल भोग, व नित्य मोक्ष ही या विचार कल्प- वृक्षाचीच फळे आहेत, मनुष्यास केवल पशुच नव्हे तर राक्षस किवा वेताळ बनविणारा अविवेक विवेकाच्या योगानेच नाहीसा होतो. संतप्त पुरुषास जल व चादणे ज्याप्रमाणे आह्लाद देते त्याप्रमाणे दुःखी प्राण्यास विवेक समाधान देतो. रात्री जसा पूर्ण चद्र शोभतो त्याप्रमाणे परमार्थ बुद्धीत विचार शोभतो. विचारी पुरुष सूर्याप्रमाणे दश दिशास प्रकाशित करितो. त्यास ससाराचे भय मुळीच वाटत नाही. विचार करी पर्यत या सृष्टीतील भाव (वस्तु) सुदर भासतात. शास्त्र व गुरु याच्या सहायाने विचार केला असता परमानदाचा अविर्भाव होतो. परमानदाच्या योगाने चित्त निःस्पृह होते. त्यास अचलत्व येते, व त्यामुळे प्राणी कृतकृत्य होतो. या अवस्थेत ज्ञानी पुरुषाचे चित्त नष्टही होत नाही व विक्षिप्तही होत नाही. तर तो या जगाकडे उदास वृत्तीने पहात रहातो. गत वस्तूची उपेक्षा करितो. प्राप्त होईल त्याप्रमाणे व्यवहार करितो. कधी क्षुब्ध होत नाही व कधी अक्षुब्ध असल्यासारखाही भासत नाही. चित्त स्थिर होणे, यातच सर्व कल्याण आहे. पूर्ण मनाच्या योगानेच महा उदार महात्मे जीवन्मुक्त होतात व पुढे दीर्घकाल त्याच अवस्थेत राहून शेवटी विदेह मुक्त होतात.