पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ८७. ८५३ (म्हणजे शुद्ध ब्रह्म अशा अशा क्रमान जगत् झाले, हा अध्यारोप व हे सर्व मिथ्या असून याचें सार ब्रह्म आहे व तेच सत्य आहे, हा अपवाद ) याच्या द्वारा भापल्या भव्यय व शुद्ध स्वरूपास प्राप्त झाला. त्रैलोक्यांतील बाह्य व आभ्यंतर स्थूल-सूक्ष्म कल्पित भाग सोइन तो स्वरूपातच क्षोभरहित होऊन राहिला. पूर्णचद्राप्रमाणे तो शीतल झाला. इद्रियादिकाचा लय करून क्रमाने त्याने प्राणस्पदही सोडला. सविद्ही शून्य असल्यासारखी झाली. ती सत्तामात्र पदास पहात राहिली. तो महात्मा निजल्यासारखा होऊन पर्व तुल्य अचल झाला. सुषुप्त-स्थैर्यानतर तो तुर्यरूपास प्राप्त झाला. त्यावेळी त्याच्या स्वरूपाचें त्यालाच भान होईनासे झालें. मी निरानद आहे की सानद ? सत् आहे की असत् ? प्रकाश आहे की अंध- कार ? किंचित् आहे की अकिचित् ? चिन्मय आहे की अचिन्मय हेही त्याला कळेना. तात्पर्य वाणीला अगोचर असलेल्या स्थितीत तो गेला. सर्व भावरहित व अति विस्तीर्ण पावन पदास प्राप्त झाला. शून्यवादी बौद्ध ज्याला शून्य म्हणतात, ब्रह्मवेत्ते ज्याला ब्रहा हे नाव देतात, विज्ञानवादी बौद्ध ज्याला अमल रिज्ञानमात्र म्हणतात, साख्य ज्याला पुरुष, म्हणतात, योगवत्त ज्याला ईश्वर म्हणतात, शैव ज्याला शिव म्हणतात कालवेत्ते ज्याला काल म्हणतात, आत्मवेत्ते ज्याला आत्मा म्हणतात, निरात्मवादी ज्याला नैरात्म्य म्हणतात, समचित्त माध्यमिक ज्याला चित् व अचित्याच्या मध्यवर्ती म्हणतात व में जीवन्मुक्ताचे सर्वस्व, जो सर्व शास्त्राचा सिद्धात, जे सर्वांच्या हृदयानुगत व जें सर्व, तेच तो महात्मा झाला. जें अत्यंत निष्क्रिय, सूर्यादि तेजाचेही भासक व स्वानुभवमात्र तेंच तो होऊन राहिला. सारांश, तो वीतहव्य या क्रमाने मुक्ताच्या दृष्टीने आकाशस्वरूपाहूनही निर्मलस्थिति व अज, अजर, अनादि, एक, अमल व निष्कल पद होऊन राहिला आणि बद्ध लोकांच्या दृष्टीने ईश्वर होऊन स्वकार्यभेदानी अनेक व सकल झाला ८७. सर्ग ८८ - वीतहव्य मुक्त झाला असता त्याच्या प्राणाचा हृदयांत लय, देहशोष व कलांचा कारणात लय. श्रीवसिष्ठ-राघवा, याप्रमाणे संसाराच्या पराकाष्ठेस प्राप्त झालेला व दुःखसागरांतून पार गेलेला तो मुनि आत्यतिक मनोनाश झाला असता शांत झाला. सागरात मिळून जाणान्या जलबिंदप्रमाणे आपल्या पावन पदी लीन झाला. त्यानंतर त्याचा देह हेमंत ऋतूंतील कमलिनीप्रमाणे