पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५२ बृहद्योगवासिष्ठसार. इत्यादिकाचे भय उपस्थित झाले असतां व उंच-सखल जागी, हातांत धरणा- रास आधार देणान्या आणि वृद्धावस्थेत अतिशय मित्र होणाऱ्या दंडकाष्ठाला नमस्कार असो. हे क्षुद्र शरीरा, हाडे, रक्त, आतडी व शिरा एवढेच ज्याचे सार आहे असें तूं तें आपले सर्व सामान घेऊन आपल्या प्रकृतीस प्राप्त हो मलिन शरीरासही शुद्ध करणाऱ्या माझ्या स्नानादि उपायांचे मजवर अनंत उपकार आहेत. यास्तव त्यानाही मला मोठ्या कृतज्ञतेने वंदन केले पाहिजे. व्यवहारास व ससारासही माझा नमस्कार असो. अहो प्राणानों, तुझी माझे सहज मित्र आहा. तुमच्या सहवर्तमान मी नाना- प्रकारन्या योनीमध्ये व पर्वताच्या दऱ्यातून वास केला, लोकांतरी श्रात झालों, नगरांतून क्रीडा केली, पर्वतावर राहिलों, नाना विलास केले व अनेक मार्गानी गेलो. या ब्रह्माडात मी तुमच्यासह केलें नाहीं; आणले नाही; भोगले नाही, आलों, गेलों, पाहिले, दिले, घेतले नाही असे काही नाही. आता मी जातो. तुह्मीही आपल्या कारणात लीन व्हा. संसारातील सर्व सयोग असेच वियोगापर्यत टिकणारे असतात. तेव्हा त्याविषयी उगीच शोक करणे उचित नव्हे. हे माझें नेत्रातील तेज सूर्योत जाऊन मिळो. त्राणेंद्रिय पृथ्वीमध्ये लीन होवो. प्राणवायु महा- वायूशी एकरूप होऊन जावो. शब्द ऐकण्याची शक्ति आकाशात तादात्म्य पावो. रसनेंतील रसशक्ति जलतत्वांत जाऊन मिळो. आता शातीचा काल आला आहे तैलरहित दीपाप्रमाणे अथवा इंधनरहित भनीप्रमाणे मी आता ओंकारोच्चार करून, त्याच्या शेवटी सर्व मनन सोहन, आत्म्या- मध्ये शात होती. अहाहा ! किती हा आनंद !! कार्यपरंपरा सोडल्यामुळे, दृश्यदशाचे उल्लघन केल्यामुळे व ब्रह्माच्या शातीस अनुमरून बुद्धिही शात झाल्यामुळे मी हा आता मोहमलरहिन होऊन राहिलो आहे व त्याकारणानेच मला हे परम मुख होत आहे ८६. मर्ग८७-वानहन्याच्या विदहमुक्तीचा क्रम. श्रीवसिष्ठ-रामा, प्रणवाचा लाब उचार करून मननादि शांतिक्रमानें सहाव्या व सातव्या भूमिकेस प्राप्त होऊन तो आपल्या हृदयस्थ ब्रह्मास प्राप्त झाला. अकार, उकार, मकार-मात्रा, प्रथम, द्वितीय, तृतीय पाद, जाग्रत्, स्यम, सुषुप्ति या तीन अवस्था इत्यादि मांडक्योपनिषदात सांगि- तलेल्या प्रकाराने प्रणवाचे स्मरण करणारा तो यति अध्यारोप व अपवाद