पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१ ५ उपशमप्रकरण-सर्ग ८६. फार उपकार आहेत. तुझ्यामुळे उद्विग्न होऊनच मी आत्म्याचा मेध केला, तेव्हा तूंच मला या मार्गाचा उपदेश केलास. तुझ्या प्रमादाने मला ही पदवी मिळाली. हे दुःखतत्त्वभूत सुखद आत्मन् , दुःख हे नाव धारण कर. णान्या तुला नमस्कार असो. हे मित्रा देहा, तुझे कल्याण अमो. तुही व माझी वियुक्त स्थिति अनादि सिद्ध आहे. याम्ना आम्ही कधी तरी वियुक्त होणार, हे ठरलेलेच आहे. अत्यत प्रिय वस्तूनाही सोडून जाणे ही प्राण्याची स्वार्थी प्रवृत्ति फार जुनी आहे आणि तोच प्रमग आता आम्हावर आला आहे शेकडों जन्म महवास करून आता मी देहाला सोडून दूर होणार. हर। हर! असो, हे मित्रा, मी आता तुज दीर्घ- कालच्या बाधवाला सोडतो. पण यात माझा काही अपराव नाहीं बरें. तूच आपल्या नाशाकरिता मला आत्मज्ञानान्या नादी लावून हा प्रसग आणलास मला आन्मज्ञान सपादन करून देऊन तूच आपला घात करून घेतला आहेस. आई तृष्णे, मी आता जातो. पण तू एकटी राहिलीस म्हणून दीन व दुखी होऊ नकोस. हे भगवन् काम, तुला जिकण्या. कारिता तुझ्या विरुद्ध असलेल्या वैराग्यादिकाचा मी आश्रय केला व त्या- मुळे तुझा मोटा अपराधी झालो आहे. पण मला क्षमा कर मी आता अन्यत उपशमास प्राप्त होत आहे. मला शुभ आशीर्वाद दे हे अबे, तृष्ण, तुझा व माझा हा सयोगापुळेच प्राप्त झालेला वियोग आज फार दिवसानी होत असून तो फार दिवस टिकणार आहे. यास्तव मी तुला शंवटचा प्रणाम करतों हे सुकृत देवा, तुला मी वदन करतों तु मला पूर्वी नरकातून काढून स्वर्गास पोंचविलें आहेस. कुकर्मरूपीभूमीत वाढलेल्या, नरकरूपी मोठमोठ्या शाखास वहाणान्या व यातना याच पुष्पभाराने युक्त असलेल्या दुष्कृतवृक्षास नमस्कार असो. ज्याच्यासह मी असख्य प्राकृनयोनी भोगल्या त्या आजपासून अदृश्य झालेल्या मोहाला मी रामराम ठोकतो. वाळले. ली पाने हीच जिची वस्त्रे आहेत अशा समाधिसमयी अत्यंत उपकार करणा-या गुहेला मीप्रणाम करतो. हे गुहे, तू माझी प्रेमळ मैत्रीण आहेस. समारमार्गाने चालता चालता अतिशय खिन्न झालेल्या मला तूं चागली निवाऱ्याची जागा दिलीस व न्यामुळे मला मोटें सुख झाले. पूर्णात्मविश्राति देऊन तूंच माझ्या सर्व लोभाचे हरण केलेंस. शोकनाशाकरिता बाकी सर्वांचा न्याग करून मी एकट्या तुज प्रियसखीचा आश्रय केला. कुत्रा, साप