पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५० बृहद्योगवासिष्ठसार. रहा. हे वेगवाना, तू आपले चाचत्य सर्वधा सोड. अहो दुष्ट इद्रिय- चोरानो, हा आत्मा तुमचा नव्हे व तुम्ही त्याची नव्हेत. तुह्मी आता नष्ट व्हा. तुमन्या आशा विफल होऊ देत. ज्याचा आश्रय भगुर आहे, अशी तुम्ही माझें भाकमण करण्यास समर्थ नाही. 'आम्हीच आत्मा' अशी जी तुमची वासना होती, ती खरी नव्हे. तत्त्वविस्मरणामुळे झालेली ती मिथ्या होय. अनात्म्यास आत्मा समजणे, हीच भ्राति असून अविचारामुळे झालेली ती विचारानें क्षीण होते. तुम्ही इद्रिये निराळी, आम्ही मनन करणारे निराळे, अद्वय ब्रह्म निराळे, कर्तृता ( प्राणप्रयक्त क्रियानिमित्तता) निराळी व भोक्ता चिदाभास निराळा. मन तर ग्रहण करणारे आहे तेव्हा या सर्वाच्या योगाने होणारा कोणता दोष कोणाला कसा लागणार ? लाकडे जगलात झाली दोऱ्या चर्म, ताग, काथ्या इत्यादिकाच्या केल्या, कुदळ, पहारय, तासणी, करवत इत्यादि लोखडापासून झाली व त्याच्या सहायाने घर बावणारा सुतार पोटाकरिता काम करू लागला तेव्हा ज्याचे प्रयोजन अगदी भिन्न भिन्न आहे अशा या सर्वांच्या योगाने होणारी गृहनिष्पत्ति काकतालीय-न्यायानेच होत अमते, असे ह्मणावयास नको का ? त्याच प्रमाणे आपापल्या शक्तींनी नियत झालेल्या या इद्रियान्या व्यापारासही काकतालीयन्याय-प्राप्तच ह्मणणे उचित होय. तेव्हा असल्या यहन्छाप्राप्त ससारापासून कोणाची काय हानि होणार ? अविद्या गेली, आत्मविद्या आली. त्यामळे जे सत् होते ते सत् झाले व असत् होते ते असत् टरलें, जे नाशवत होते ते नष्ट झाले व नित्य होते ते राहिले. राघवा, अशाप्रकारे विचार करून तो महातपस्वी भगवान् मुनिश्रेष्ठ अनेक वर्षे नये राहिला, त्याची सर्व चिता नष्ट झाली व मूढता दूर राहिली. नापानाचा आश्रय करून मुखाने राहू लागला. त्याचे मन इन्छा व अनिन्छ, यानी रहित झाले. जन्म व कर्म याच्या सीमेवर असणा-या विदेह कैवल्याच्या इन्छन तो सयाद्रिच्या एका गुहमध्ये जाऊन बसला, व तेथेही पमासन घालून तो आपल्याशीच म्हणाला, " हे रागा, त नीराग हो. अर देषा, तृ निपतेस प्राप्त हो. मी तुमन्यासह या संसारात फार दिवम क्रिडा केली. अहो भोगानो, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही मला या ससारात फार दिवस लोळविलेत. या पर व पुण्य निर्वाणपदवीस ज्याच्या योगाने मी विसरलों त्या विषयसुखाला नमस्कार असो. हे दुःखा, तुझे मजवर