पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५उपशमप्रक ५ उपशमप्रकरण-सर्ग ८६. ८४९ झाकलेल्या मुनिशरीरास वर काढण्याची आज्ञा केली. तेव्हां वीतहव्यही भगवान् नारायणास नमस्कार करून त्याच्या आज्ञेने पिंगलाबरोबर विध्याद्रीवर आला. इष्ट स्थळी पोंचताच पिगलाने नखाने भूमि उकरून त्याच्या शरीरास वर काढले. तेव्हा मुनीचे पुर्यष्टक आपल्या कले- वरात शिरलें व त्याबरोबर ते जड शरीर घोडे जोडलेल्या रथाप्रमाणे चेष्टा करू लागले. वीतहव्य व पिंगल यानी परस्परास नमस्कार केला आणि ते आपापल्या कार्यात निमग्न झाले. पिंगल आकाशात गेला व मुनि शुद्ध मरोवरावर जाऊन पोंचला. प्रफुल्लित कमलानी युक्त असलेल्या स्वच्छ सरोवरात त्या महात्म्याने स्नान केले. जप करून सूर्याची पूजा केली व मननादि व्यवहाराने युक्त असलेल्या शरीराने तो पूर्वीप्रमाणे शोभू लागला. राघवा, नतर मरण, मैत्री, समता, शाति, प्रज्ञा, आनदता, कृपा व श्री यानी युक्त असलेला तो सकल-संगशून्य मुनि त्या विंध्यपर्वतावरील सरोवराच्या काठी एकच दिवस रममाण झाला. (म्हणजे समाधि सोडून राहिला.) ८५. सर्ग ८६-पुनः सहा दिवस समाधि, दीर्घकाल जीवन्मुक्त-स्थिति व रागादिकास नमस्कारपूर्वक निरोप, श्रीवसिष्ठ-सायकाळी पुनः समाधि लावण्याकरिता तो मुनि एका ओळखीच्या विध्य गुहेत शिरला व आसनावर बसून तो म्हणाला, "मी इंद्रियाचा उपसंहार तर पूर्वीच केला आहे. आता त्याविषयी अधिक विचार करण्याचे प्रयोजन राहिले नाही यास्तव आहे व नाही, ही कल्पना सोडून व बाकी राहिलेल्या साक्षि चिन्मात्राचा आश्रय करून मी निश्चल रहातो. स्वच्छतेस प्राप्त होऊन मी सम व समरस होऊन बसतो. तुर्या- वस्थेचा आश्रय करतो." असा विचार करून तो पुन: सहा दिवस ध्यान करीत बसला. त्यानंतर क्षणभर झाडाखाली निजलेल्या वाटसरूप्रमाणे तो जागा झाला आणि तेव्हापासून सिद्ध झालेला तो म तपस्वी वीतहन्य जीवन्मक्ततेने चिरकाल विहार करीत राहिला. त्याने कोणत्याही वस्तुचे अभिनदन किंवा निंदा केली नाही. त्याला उद्वेग किवा हर्प कधीही झाला नाही. जात येत असताना किंवा एकत्र स्थित असताना चित्त-विनोदार्थ त्याच्या आपल्याशीच अशा गोष्टी चालल्या. हे इंद्रियेश्वरा मना, शांत झाल्याकारणाने तुला आता किती सुख होत आहे, याचा विचार कर बरें! भाता याच विरक्तदशेत सतत ५४