पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ उपशमप्रकरण-सर्ग ६९. ८१७ स्मिका आहे, असे समजल्यावर सर्व देश व काल तिच्या उदरांत रहात असल्यामुळे त्यांत अशक्य असे काहीच नाही. शिवाय ज्यांचा अनुभव घ्यावयाचा त्यांच्या देश-कालामध्ये जर अस विरोध आढळला तर तो दोषच होय, यांत संशय नाही. पण अनुभव घेणारा व ज्याचा अनुभव घ्यावयाचा आहे अशा दोघांमध्ये हा विरोध येतच नाही. कारण खनामध्ये अति संकुचित हृदय प्रदेशी हिमालया- सारखा अतिविस्तृत पदार्थाचा अनुभव येतो; हे सर्वांना माहीत आहे. असो;) त्या कारणाने वीतहल्याने मनांतल्या मनात नानाप्रकारची जगें पाहिली. पण त्याची ही वासना होती, असे समजू नकोस. कारण यथार्थ ज्ञानवानाची असली वासना खरी वासनाच नव्हे. ज्ञानानीने दग्ध झालेली ती भाजलेल्या बीजाप्रमाणे केवळ वासनाकार असते. एक कल्पभर तो शकराचा गण होता. त्याचे ते गाणात्य सवे विद्यानीं निपुण व त्रिकाल दर्शनयुक्त होते. तो जरी जीवन्मुक्त झाला होता तरी भोग देणाऱ्या प्रार- ब्धाने जाग्रत केलेल्या दृढ संस्कारामुळे त्याला देहभोगादि विचित्र प्रति- भास झाले. श्रीराम-मनिराज, मग जीवन्मुक्ताना सुद्धा बंध-मोक्षदृष्टि असतात, असे म्हणावे लागते. श्रीवसिष्ठ-छः; हे सर्व विश्व ब्रह्मच आहे, असें जाणणान्या जीव-म- क्ताना बंध-मोक्ष दृष्टी कशा असणार ! आकाश जसें भोपाधिक नाना आकार धारण करते त्याप्रमाणे त्या ब्रह्मरूप महात्म्याला नाना प्रकार दिस- तात. वीतहव्याच्या हृदयांतील चैतन्य हाच आमचा सर्वाचा आत्मा अस- ल्यामळे सर्व जीवाचे अनुभव हे त्याचेच होत. त्याकारणानेच जो वस्तुतः निःस्वरूप पण प्रातिभासिकदृष्टया अति विशाल भुवनांमध्ये इंद्र होता तोच काही वेळाने दीन देशाचा राजा होऊन अरण्यात मगया करावयास प्रवत्त झाला. पाद्मकरूपांत वीतहव्य जेव्हां गाणपत्याचा अनुभव घेत होता तेव्हा कैलासवनांत त्याचा जो क्रीडाहंस होता तोच आतां निषाद- राजा होऊन राहिला आहे. श्रीराम-महाराज, वीतहण्याची ही सर्व मानस सृष्टि होती. तेन्हां त्यांतील भ्रांतिमात्र इंद्र-हंस इत्यादि देहाकार कसे झाले ! श्रीवसिष्ठ--रामा, सर्व जगच बर मनाचे कार्य असल्यामुळे भ्रांति-