पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१६ ग्रहयोगवासिष्ठसार. जीवन्मक्ततेमुळे त्याने शरीरत्याग केला नाही; तर तो ध्यानांत निमग्न होऊन राहिला. मर्त्यलोकचा एवढा मोठा काळ लोटला तरी तो योगक्ता चित्राप्रमाणे स्तब्ध राहिला. मोठे धनी करणान्या जलपातांच्या योगार्ने, मृगयेकरितां आलेल्या राजांच्या हत्तींच्या बृंहितानी; पक्षि, वानर इत्यादि- कांच्या गोंगाटांनी, सिंह, व्याघ्र इत्यादिकांच्या भयंकर ओरडण्यांनी, त्यांच्या हाती लागलेल्या दीन प्राण्यांच्या केविलवाण्या आरोळ्यानी, भयंकर मेष- गर्जनेसह झालेल्या विद्युत्पातांनी, लोकाच्या कोलाहलांनी, दावाग्नीच्या योगाने, मेघाच्या गडगडाटानी व जलौघांनीही तो देहभानावर आला नाही. याप्रमाणे कालाचा प्रवाह व्यर्थ चालला असता वर्षासमयी हळु हळ जमणान्या चिखलात तो काही वर्षांनी रुतून राहिला. त्यामुळे त्याला कोणी भूमीत पुरलेच आहे, असे वाटत असे. पर्वताला चिटकून राहिलेल्या शिलेप्रमाणे त्याचे खादे भूमीत लिपल्यासारखे झाले. पण समाधिसुखांत निमग्न झालेल्या त्याला काही पीडा झाली नाही. तीनशे वर्षांनी तो आपोआप सावध झाला. लिंगदेहस्थ संवित्-नेच त्याच्या देहाचे पालन केले. प्राणवृत्तिम्प स्पंद सूक्ष्म अमल्यामुळे तो त्याला धारण करू शकला नाही. असो; तीनशे वर्षांनतर त्याची जीवसंवित् अवशिष्ट प्रारब्ध भोगां- करिता हृदयांत उत्पन्न होऊन हळू हळु वाढत मनोरूपिणी झाली व तिने स्वकल्पनेनेच हृदयातल्या हृदयात विचित्र अनुभव घेतला. ___ न्याने कैलास पर्वताजवळच्या अरण्यांत कदंब वृक्षाखाली शंभर वर्ष जीवन्मुक्त-अवस्थेत मुनिन्दाचा अनुभव घेतला. शभर वर्षे मानसिक पीडारहित विद्याधरत्व व पांच युगे इद्रत्व भोगलें. श्रीराम-मनिवर्य, न्या मनीच्या या प्रतिभासांत दिशा व काल यांचा केलासकानन, पाच युगें-हा नियम 4-अल्पकाल, दयप्रदेश-हा अनियम कसा उपपन्न होतो! दिशा व काल यांच्या नियतीत बदल पाहणे शक्य नाही. श्रीवसिष्ठ--ही सर्वात्मिका चिच्छक्ति जेथे जशी जशी उदय पावते तेथे तशीच तत्काल होते. (म्हणजे चित् सर्वात्मरूप नाही; तर ती मर्यादित आहे, असे जाणल्यास मल्प देश व काल यांत विस्तृत देश ३ काल यांचा संभव होतो. पण ती सवा-