पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ८४. जसें तम त्याप्रमाणे विचाराने तृ शात होतेस. हे मित्रा, आजपर्यंत अल्प- विवेकतेमुळे तु पुष्ट होत होतेस व त्यामुळे तुला दुख होत असे. पण असत् असलेले मी पुष्ट कसे होईन-म्हणून म्हणशील तर सागतो. केवल मोहसंकल्पाने, बाळानें कम्पिलेल्या वेताळाप्रमाणे, तुझी पुष्टि संवनीय भाहे. तुझ्या स्वरूपात विलक्षण फरक पाडणा-या विवेकाम नमस्कार अमो. हे चित्ता, आता तू स्वत.च बहुतप्रकारं प्रबुद्ध झा : आहेस व तुजवर चागले शास्त्रसस्कारही घडले आहेत. त्यामुळे तुझी चित्तता जाऊन त स्वतः परमेश्वर होऊन राहिले आहेस. तुझ्या कल्याणाकरिताच तुझे प्राचीन स्वरूप तुला प्राप्त झाले आहे. आता सर्ववामनापासून सर्वथा मुक्त झालेले तुं महेश्वरच आहेस ज्याची उत्पत्ति अविवेकामळेच झालेली असते त्याचा विवेकाने नाश होणे हा न्यायच आहे. हा तुझा सर्वतोमुख नाश सुखोदकं आहे. __ असो, तर हे चित्ता, सिद्वानयुक्तींनी त नाहीस, असा मी निर्णय केला आहे. आता हे इद्रियान्या ईश्वरा, तुझे उदड कल्याण होवो. स्वस्ति भवते. तुझ्या असत्तेनेच मला परमपुरुपार्थाचा लाभ झाला आहे. मी अखट शातीचा अनुभव घेत आहे. मी आम्यामध्ये स्थित आहे. मी तुर्यपदी आरूट झालो आहे. मी आत्मा आहे व आत्म्यावाचून काही नाही. स्फुरण पावणारी चित हा बोधा-मा मी आहे शुद्ध चित् मध्ये हा आत्मा' एवढीही कल्पना उद्भवत नाही, मग बाकीन्या तर दूरच राहिल्या कारण अन्याच्या अपेक्षेनेच होणारी कल्पना अद्वितीय वस्तुन्या ठायीं सभवणार कशी? यास्तव 'हा मी' असेही न म्हणता मी मौन धारण करून स्वस्थ बसतों ८३. सर्ग ८४-वतिहव्याची समाधि, पृवीन्या विवरातील निवास, हृदयांत त्याला भासलेले भास. श्रीवसिष्ठ-कौसल्यासूनो, असा निर्णय करून तो वासनारहिन वीतहव्य विध्यपर्वतान्या एका निर्वात गुहेत समाधि लावून बसला. वृत्ति सर्वथा शून्य झाल्याकारणाने तो आनदसुदर मुनि शातसागराप्रमाणे दिसत होता. त्याचा प्राणवायु क्रमाने आतल्या आत क्षीण झाला व त्यानंतर आसनादि योगमुद्रेने आतन व बाहेरून स्थिर झालेल्या त्याची तीनशे वर्षे त्या एकात स्थळी एका घटिकेप्रमाणे गेली. त्या मात्मज्ञाला एवढा काल लोटला तरी त्याचे भान झाले नाही.