पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरणं-सर्ग १४. ८३ जाणणे हा अर्थानानुबधविचार होय. जेथे स्वाभाविकप्रवृत्ति व विषय अस- तात तेथें अनर्थकारणत्व असते, हा अन्वय व जेथे ती दोन्ही नसतात तेथें अनर्थकारणत्व नसते, हा व्यतिरेक होय. शास्त्रीय प्रवृत्ति व वैराग्य आणि पुरुषार्थसंबध याचे अन्वय-व्यतिरेकही असेच जाणावे. स्वदेह व स्त्री-पत्र इत्यादिकांचे देह यांमध्ये शुद्धता मुळीच नाही. कारण त्याचे बीज, न्याचे- देह या अवस्थेतील रक्त-मास-मूत्र-विष्ठादियुक्त स्वरूप व त्याचा प्राण निवन गेल्यावर होणारा परिणाम याच्याकडे दृष्टि दिली असता त्यात शुद्धीचा गधही आढळत नाही. यास्तव सर्व शरीरे असार आहेत. त्याचप्रमाणे ब्रह्मलोकापर्यत जितकी सुखें आहेत ती सर्व अनित्य व दुःखमिश्रित आहेत. यास्तव त्यातही सार नाही, असा निश्चय करून शुद्ध, नित्य, व निरतिशय आत्मा हेच सार आहे, असा विचार करणे, हा सारासार-विचार होय. या दोन विचाराच्या योगाने मुमुक्षा झणजे मुक्त होण्याची इच्छा होते. मुमुक्षेनतर मोक्षाचे साधन कर्म आहे की उपासना ? की ती दोन्हीं ? की कर्म व ज्ञान ? अथवा केवल ज्ञानच ? या प्रश्नाचा निर्णय करणे हा तिसरा विचार होय. ज्ञानच मोक्षाचे साधन आहे, असे जरी ठरले तरी साख्य, वैशेषिक इत्यादि-शास्त्रजन्य ज्ञान मोक्षसाधन आहे की, वेदशास्त्र- जन्य ज्ञान मोक्षसाधन आहे ? वैदिकज्ञान जरी मोक्षाचे सावन असले तरी वेदाचे तात्पर्य द्वैतात आहे की अद्वैतात? सविशेष ईश्वरामध्ये की निर्विशेप ब्रह्मामध्ये? आत्म्यामध्ये की अनात्म्यामध्ये ? याचा निश्चय करणे हा चवथा विचार होय. यासच श्रवण झणतात. वेदादि प्रमाणाचे तात्पर्य अद्वितीय सच्चिदानद ब्रह्मामध्ये आहे, असा निश्चय जरी झाला तरी वस्तुतः आत्म्याच्या ठायी ते सर्व लक्षण सभवते की नाही, याचा निर्णय करण्याकरिता रत्न-परीक्षान्यायाने अनुभवनिष्ठ गुरु व सहाध्यायी याच्याशी संवाद करून जीव, ईश्वर व जगन् यांच्या तत्त्वाचा निश्चय करणे हा पाचवा विचार ह्मणजे भात्मतत्त्वपरीक्षा होय. या पाचातील पहिल्या तीन विचाराच्या योगाने नित्यानित्य-वस्तु-विवेक, इहामुत्रार्थ-फलभोगविराग ( वैराग्य ), शमादि-सपत्ति व मुमुक्षुत्व या चार साधनाची प्राप्ति होते, आणि शेवटच्या दोन विचाराच्या योगाने क्रमाने प्रमाणासंभावना ह्मणजे आत्मा व ब्रह्म यांच्या ऐक्याविषयी प्रमाणच नाही. ही शका व प्रमेयासंभवना ह्मणजे ऐक्याची असंभावना, निवृत्त होते.