पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपञ्चमप्रकरण-सर्ग ८ ॥ कोठचे! शिळा कधी तरी नाचली माहे का! कळसूत्री मा. ठीप्रमाणे तूं ईश्वराच्या बळावर जिवंत रहातेस, इच्छा करतेस, मारतेंस व वृथा चेष्टा करतेस. ज्याच्या शक्तीने में होतें तें याचेच कृत्य होय. सुरी, कुन्हाड इत्यादि साधने वेळ, वक्ष इत्यादिकांस, तोडणान्या पुरुषाच्या सामर्थ्याने, तोडतात. यास्तव त्यांना खरोखरी तोडणारा पुरुषच आहे. जो ज्याच्या शक्तीने मरतो तोच त्याला मारणारा होय. तरवार पुरुषाच्या शक्तीने त्याच्या शत्रुस मारते. यास्तव पुरुष हा त्याला मारणारा आहे. पात्राने पेय पिणारा पुरुष पाता (पान- कर्ता) आहे; पात्र नव्हे. त्याचप्रमाणे हे चित्ता, तूं स्वभावतः जड आहेस. सर्वज्ञ आत्मा तुला बोधसपन्न करीत असतो. परमेश्वर आत्मा तुला सतत ज्ञानशक्ति देत असतो. अज्ञाना ज्ञानसपन्न करणे हे ज्ञान्याचे कर्तव्यच माहे. तुझे नांव व रूपही आत्मबोधाधान आहे. आत्माच आपल्या अज्ञा- नामुळे तुझ्यासारखा झाला आहे व तो आपल्या ज्ञानानेच तुझ्या रूपा- पासून मुक्त होत असतो. यास्तव तू मूढ व मृत आहेस. परमार्थतः तू नाहीस. यास्तव व्यर्थ अध्यास करू नकोस. चिज्जड-अध्यासामुळेच तुला दुःख होते. अरे मूढा, तू आत्मत्वबोधानें चिन्मय जर झालेंस तर परम पदाहून मुळीच भिन्न रहाणार नाहीस. मग तुला शोकाचे कारणच काय आहे. कारण तें पद सर्वग सर्वभावस्थ व सर्वरूप आहे. यास्तव तें प्राप्त झाले झणजे अप्राप्त असे काही रहात नाही. वस्तुत: तूं नाहीस व देह नाही. तर एक महत् ब्रह्मच हे सर्व स्फुरत आहे. मित्रा, तूं कर्ता नन्हेस. उगीच शोक करू नकोस ईश्वर शोच्य मुळीच नाही. तूं माझे ऐक व त्याला अनन्य शरण जा. तो सर्वाधार तुला आपल्या स्वरूपांत घेईल. राघवा, याप्रमाणे इंद्रिये व मन याना नानाप्रकारचा भात्मतत्त्वोपदेश करीत व त्यांना निश्चयाने आपल्या अधीन माणीत त्या पर्णकुटीत तो महात्मा वीतहव्य राहिला ८२. सर्ग ८३-चित्त व इंद्रिये असत तो सर्व अनर्थ व त्यांच्या प्रभाग निरंतर सुख. श्रीवासिष्ठ- दशरथपुत्रा, तो मुनिवर्य शुद्ध बुद्धीने भापल्या इंद्रिय- गमास पुनः असा बोध करूं लागला. इंद्रियांनो, तुमची ही मिथ्या सत्ता केवल दुःखाला व नाशालाप कारण होणारी आहे. यास्तव तिला सोडा. माझ्या या उपदेशाने