पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ८०. ८३९ संतोष देत नाही. गारुड्याच्या मातील मनःस्पदाप्रमाणे वृत्तींमध्ये तू व्यर्थ जळत आहेस. चित्ता, तूं रहा अथवा जा. तू माझें नाहीस व जिवंतही नाहीस. आपल्या स्वाभाविक असत्त्वामुळेच तूं मृत माहेस. पण मी आणखी चांगला विचार केला म्हणजे अगदी मृत (अत्यंत असत् होशील. तूं निस्तत्व, जड, भ्रात व शठ आहेस. मूढालाच तूं भज्ञानाच्या योगाने बाधा करतेस. विचारवानाला नाही. इतके दिवस मिथ्या असलेल्या तुला आम्ही जाणले नव्हते. पण दिवा लावताच तिमिर असत् आहे, हे जसे साक्षात् कळते त्याप्रमाणे ज्ञान होताच आता तं आम्हाला मत असल्यासारखें झालें आहेस. आजवर तूं माझें देहगृह अड- वून धरले होतेस. त्यामुळे शम, दम, विचार, बोध याना त्यांत शिरा- वयास अवकाशच मिळत नसे. पण हे शठ मना, मातां तूं जड व प्रेत- तुल्य झाले आहेस. त्यामुळे भाजपासून हे माझें गह शमादि सर्व सज्जनास संसेन्य होईल. हे जगद्रूप चित्तवेताळा, तूं पूर्वीच नव्हतेस. आतां तर मुळीच नाहीस. पुढेही नसशील. पण याप्रमाणे मी तुझा त्रिकाली निषेध करीत असतांनाही येथे राहण्याची तुला लाज वाटत नाही. तृष्णा पिशाची व कोपादि गुह्यक यासह हे चित्तवेताळा, तूं माझ्या शरीरगृहातून निघ. मोठी संतोषाची गोष्ट आहे की, केवल विवेकाच्या योगानेच मत्त चित्त- बेताळ देहमंदिरांतून निघून गेला. काय चमत्कार आहे ! या जड व क्षण- भगुर मनाने सर्व जीवास परवश करून सोडले आहे. अरे भिन्या मना, देहाला आत्मा समजल्यामुळे आपोआप मेलेल्या लोकानाच तूं मारतेंस. यांत तुझा कोणता मोठा पुरुषार्थ आहे ? तुझ्यामध्ये धैर्य असेल तर मज अद्वितीय आत्मभूत वीरावर चालून ये तूं असत आहेस, भसें जाणणे हाच तुझा वध असल्यामुळे मला भातां तुला मारण्याची गरजच राहिलेली नाही. तुझ्या सहायाची आशा सोडून आता मी आत्म्यामध्ये सुखरूपपणे राहीन. मन मरतांच चिंता सती गेली व विचारमंत्राने अहकारराक्षस गाडला गेला. आता मला आपल्या शरीरगृहांत सुखाने नांदण्यास कोण- स्याही प्रकारची अडचण नाही. एक, कृतकृत्य, नित्य, निर्मल व निर्वि- कल्प चिद्रूप अशा मलाच नमस्कार असो. मला शोक नाही; मोह नाही; मी स्वतःच नाहीं; व अन्यही कोणी नाही. मला आशा नाहीं; कमें नाहीत; संसार नाहीं;कर्तृता नाही; व भोक्तृता नाही.देहही माझा नव्हे. मीच आदि,