पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ वृहद्योगवासिष्ठसार. जीव आहे. बैल भार वाहण्याकरितांच असून भाराचा धनी दुसराच असतो. तेव्हां नेत्र रूपामध्ये निमग्न झाले असतां देही भात्म्याला क्षुन्ध होण्याचे काय कारण ? रजकाच्या भारवाहक गर्दभातील एकादा चिख- लात रुतला तर त्यांत रजकाची शरीरतः कोणती हानि आहे ! देही नेत्रांचा स्वामी असल्यामुळे विचाराने त्याला त्याचे निवारणही करता येते.विचार असा करावा. हे अधम नयना, या रूपकर्दमाचा स्वाद घेऊ नकोस. कारण ते एका निमिषांत नष्ट होऊन तुझाही घात करील. असा बोधरूप विचार करून सर्व इद्रियाना विषयपगमुख करावे. असा विचार करणारा प्राज्ञ विषयास आपल्या स्वाभाविक प्रकाशनशक्तीनें प्रकाशित करतो. पण त्यांत रुतून रहात नाही. अरे नेत्रा, असन्मय, विनाशी व भापातरमणीय रूपाचा, मृत्यूच्या मुखांत प्रवेश करण्याकरितां, आश्रय करूं नको. सर्वार्थ- प्रकाशक परमात्मा उदासीन. प्रकाश्य विषयही स्वस्थ. मग बा नेत्रा, तूंच व्यर्थ का संतप्त होतोस ? आपल्या साक्षीला पहा. चित्ता, नेत्र जरी रूपादि विषयांकडे जात असले तरी तूं त्यांच्यामध्ये भासक्त कशाला होतेंस: अथवा चित्तही जरी इंद्रियांच्या द्वारा विषयाकार होत असले तरी हे अहं- कारा, तूं त्याचे ठिकाणी अभिनिवेश कशाला ठेवतोस? रूपदर्शन व मनः- संकल्प हे परस्पर असबद्ध आहेत. पण आरसा व मुख याच्याप्रमाणे परस्परसंबद्ध असल्यासारखे दिसतात. अज्ञानतंतनें याना एकमेकांशी शिवून टाकले आहे. पण ज्ञानरूपी कातरीने तो ततु तोडून टाकला म्हणजे ते पृथक व असन्मय होऊन रहातात. मनःसकल्पानेच ते पर- स्पर सुसबद्ध झाले आहेत. अभ्यासाने मनाचा नाश करून विचाराने मज्ञानाला तोडून टाकलें म्हणजे रूपदर्शन व मनःसंकल्पादिक याचा संसर्ग होत नाही. चित्त सर्व इंद्रियांना जागे करीत असते. यास्तव घरां. तौल पिशाचाप्रमाणे त्याचाच उच्छेद करावा. अरे चित्ता, तुं व्यर्थ गडबड करीत आहेस. तुझा बाध करण्याचा उपाय मी शोधून काढला आहे. भूत व भविष्यत् कालाप्रमाणे तूं वर्तमानसमयींही असत् आहेस. तेव्हा इंद्रियांनी आणून पोचविलेल्या शब्दादि पांच विषयांच्या योगानें तूं व्यर्थ कष्ट का करीत आहेस ! जो प्रमाता ( जीव ) तुला आपले म्हणून समजत असतो याचेच उपकरण होऊन तूं असें म्यर्थ नाचत असतेस. मज चिदेकरस उदासीनाकरिता नव्हे. मरे दुष्ट मना, तुझे हे नृत्य मला थोडासाही