Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ७९. विषयभोगोत्कठाशून्य, हिताहितवासनारहित व सर्व व्यवहारात सम (हर्ष- विषादरहित ) असतो व त्यामुळे तो साक्षात् भगवान् होतो ७८. सर्ग ७९-चित्तनाशाच्या ज्ञानरूप दुमन्या उपायाचे निरूपण. श्रीराम-भगवन् , योगयुक्त चित्ताचा शम सागितलात. आतां कृपा करून सम्यग्-ज्ञानाचे वर्णन करा. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, आदि-अतरहित, ज्ञानस्वरूप, एक परमा मा या सृष्टीत आहे, असा असाधारण व अमर्यादाकार निश्चय करणे यालाच ज्ञानी यथार्थ ज्ञान म्हणतात. हे घट-पटप्रभति शेकडो पदार्य भान्माच आहे, असा निश्चय करणे, हेच यथार्थ ज्ञान होय. अयथार्थ ज्ञानाने जन्म व यथार्थ ज्ञानाने मोक्ष. अज्ञानामुळे रज्जु सर्प होते, पण तिला प्रमाणन जाणले म्हणजे सर्प कोठे नाहीसा होतो. सकल्पाशरहिन, विषयवजित व स्वप्रकाश स्वभावामुळेच मवेतः प्रसिद्ध होणारी सवित् या मुक्तीन असते. शुद्ध सवित् हाच परमात्मा. तोच विषय. त्यामध्ये ट्रेतकल्पनाच नाही. आत्माच सर्व जगत्. मग बब-मोक्ष कोठचा ? ब्रम मत्र मोठ्या पदाहिन अति मोटे आहे. त्याच्या ज्ञानाने द्वैतभ्रम शात होतो. याम्तव रामा, नहीं या सम्यग-ज्ञानाने आमा हो. न्यानतर तुटा काट, पाषाणा, वस्त्रे इत्यादिकाचा भेद भासणार नाही. द्वैत, अद्वत, जरा, मरण इत्यादि भ्रमान्या योगाने आत्माच स्फुरतो. अत.स्य बुद्धीने शुद्ध आत्म्याला मतत आलिंगन देऊन जो रहातो त्याला कोणते भोग बद्ध करण्यास समर्थ होणार आहेत ? ज्याने फार विचार केला आहे त्याला कामादि सहा रिपू योडी सुद्धा पीडा देऊ शकत नाहीत. आशापरायण अविचारी मूढामच दव गिळून टाकीत असतात. सर्व जग मामाच आहे, अविद्या कोठेही नाही, या दृष्टीचा आश्रय करून तूं सम्यग्रूप होऊन रहा. कारण आ मनि- श्यवान् पुरुष मुक्तच आहे, असे म्हणतात ७९. सर्ग ८०-ज्या दृढविमर्शाच्या योगाने समोर आलेल्या दिव्य भोगाचीही इन्छा होत नाही त्याचे वर्णन. चित्तवताळाचे निरसन. श्रीवसिष्ठ-राघवा, याप्रमाणे मनांत सतत विवेक करणान्या ज्ञानी पुरुषास पुढे आलेल्या भोगाविषयीही इच्छा होत नाही. कारण नेत्र केवल पहाण्याकरिता आहेत. सुखदुःख भोगण्याकरिता नाहीत. त्याचा भोक्ता