पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८३६ बृहद्योगवासिष्ठसार. प्राणस्पद प्रतिबद्ध होतो. सूक्ष्म हृदयाकाशात चित्ताला स्थिर केले असता मात्मसाक्षात्कार होऊन प्राणस्पद निरुद्ध होतो. बा साधो, या सृष्टीत भूताचे हृदय दोन प्रकारचे आहे. एक हेय (त्याज्य) व दुसरें उपादेय (ग्राह्य).शरीराच्या एकाभागी उराच्या आत अस- लेले हे मर्यादित हृदय हेय आहे व ज्ञानमात्र हृदय उपादेय आहे. तें भात व बाहेरही आहे. अथवा तें नि.सग अमत्यामुळे आत नाहीं व बाहेरही नाही. तेच मुख्य हृदय असून त्याच्या आत हे सर्व त्रिभुवन साठविलेले आहे. तोच सर्व पदार्थाचा आरमा व सर्व सपत्तीचा कोश आहे. वस्तुतः सवित् हेच सर्व प्राण्याचे हृदय आहे. उरात अमलेला एक जड मामाचा तुकडा नव्हे यास्तव सर्व वामना सीइन मवित्-रूप शद्ध हृदयात चित्ताला बलात्काराने नियुक्त केले असता प्राणस्पद निरुद्ध होतो. अनेक अनुभवी गुरुनी सागितलेल्या या व अमल्याच दुमयाही उपायानी प्राणनिरोव करावा, पण हटयोगाने न्याला वश करण्याचा प्रयान करू नये हनु हनु अन्यामानेच पूर्वोक्त युक्ती भाग्यवानान्या ससार- भगाम कारण होतात. अमामाने दृढ व चराग्याने चिहिन झाटलाच वासनाशून्य प्राणायाम सफल होतो. एवढ्यासाठीच योगशास्त्रात भ्रमन्यादि निरनिराळ्या स्थानी धारणंचा अभ्यास करावयास मागितले आहे. अभ्या. साने प्राण शात होतो. अभ्यासानेच पुरुष आत्माराम, वीतशोक (शोक- शन्य ) व अत.मुग्य होतो. यास्तव तू अभ्यास कर. अभ्यासाने प्राणाचा परिस्पद क्षीण झाला असता मन शात हात व निर्वाण अवशिष्ट रहात. वासनावेष्टित मन हाच जन्म व वासनागन्य मन हाच मोक्ष होय. प्राण- स्पद हेच मनाचे रूप आहे व त्यापामृन ममारभ्रम होता. यास्तव तोच शात झाला म्हणजे मसारवर आपोआप उतरतो. विकल्पाश गेला की ते पावन पद अवशिष्ट रहाते. त्याचे वाणीने वर्णन व मनाने सकल्प करता येत नाही त्या निर्गुणाला दृष्टान कशाचा देणार. कारण त्यावाचून सर्व विनाशि, कल्पित व मगुण आहे. अत करणात चिच्चद्रिका उदय पावली की दृश्यामध्ये गुप्त असलेले तत्व व्यक्त दिसू लागते. त्या कल्पतरू पासून असख्य रसाळ संसार-फळे नित्य उदय व क्षय पावत असतात. ते तत्त्व म्हणजे सर्व मर्यादाची परा काष्ठा आहे. त्याचा आश्रय करून जो रहातो तो स्थिरचित्त पुरुष जीवन्मुक्त होतो. रामा, मुक्तचित्त पुरुषोत्तम