पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ७८. ५ व योग-असे दोन उपाय आहेत. यथार्थदर्शन हे ज्ञान व चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणे हा योग होय. श्रीराम-भगवन् , केव्हां व कोणत्या प्राणापानसंबंधी योगनामक युक्तीने अनंत सुखप्रद मनःशाति मिळते. श्रीवसिष्ठ-या देहांत व देहनाडीमध्ये जो हा वायु सर्वतः स्फुरण पावत असतो त्याला प्राण असे म्हणतात, स्पंदवशात् आत निरनिराळ्या क्रिया करणाऱ्या स्यालाच अपान, व्यान इत्यादि नावें विद्वानानी योजली आहेत. प्राण व चित्त याचे ऐक्य होते. सुगंध व पुष्प याप्रमाणे हा प्राणसज्ञक चित्ताचा आधार चित्तरूप झाला आहे. आतील प्राणपरि- स्पंदामुळे संकल्प करण्यास सज्ज झालेली सवित्च चित्त होय. प्राण. स्पंदामुळेच चित्चा स्पद होतो. चिस्पंदामुळे ज्ञान होते. चित्त प्राण- परिस्पंदाच्या अधीन आहे, असें वेदवेत्ते म्हणतात. यास्तव प्राणनिरोध केला म्हणजे मन शात होते व मनःस्पदाची शाति झाली म्हणजे हा संसार लीन होतो. श्रीराम-गुरुवर्य, देहरूपी गृहामध्ये सतत संचार करणान्या वायूचा रोध कसा करिता येईल? श्रीवसिष्ठ-शास्त्र व सज्जन याचा संपर्क व वैराग्याभ्यास याच्या योगाने पूर्वसंसार-वृत्तींमध्ये अनास्था केली असता व इष्ट ईशाचें ध्यान कले असतां चित्त एकाग्र होते. त्यानतर एकाच तत्त्वाचा दृढ अभ्यास केला असता प्राणस्पदाचा निरोध होतो. पूरकादिकाच्या योगानें प्राणाचा भायाम ( दीर्घता ), सहज दृढ अभ्यास व एकांत-ध्यान-योग यांच्या योगाने प्राणस्पंदाचा निरोध होतो. दीर्घ उच्चारलेल्या प्रणवाच्या चवथ्या मात्रेचा अवलंब केल्यामुळे बाह्य विषयज्ञानाचा आत्यंतिक उपशम झाला असता प्राणस्पंद निरुद्ध होतो. रेचक व पूरक यांचा दीर्घ अभ्यास व ध्यान यांच्या योगानेही प्राणनिरोध करता येतो. कुंभक, कुंभांतील जलाप्रमाणे, निश्चल झाला म्हणजे प्राणस्पंदाचा निरोध होतो. योगशास्त्रांत सांगितलेल्या पद्धतीने यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि यांच्या अभ्यासाने प्राणनिरोध करता येतो. गुरु किंवा ईश्वर संग अनुप्रहामुळे झटकन ज्ञान होऊन सटकन चिचोपशम झाल्यानेही