पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. असते. कार्यप्रयुक्त सुख-दुःखाच्या योगाने त्याचे चित्त कलुषित होत नाही. त्याला कशाचाही विस्मय वाटत नाही. कारण चिदात्म्याच्या शक्ती पाहिजे ते करू शकतात, असा त्याच्या मनाचा निश्चय असतो. दया, दैन्य, क्रौर्य, लज्जा, अलज्जा इत्यादिकांचेही तो अनुसंधान करीत नाही. तो दीन, उद्धत, प्रमत्त, खिन्न व हर्षवान् नसतो. त्याच्या हृदयांत कोपादिक उत्पन्न होत नाहीत. रामा, ज्यामध्ये प्राणी सतत उत्पन्न होत आहेत व मरत आहेत अशा या संसार स्थितीत (या जगांत) सुखिता व दुःखिता कशी, कोठे व कितिशी असणार ? फेसासारख्या क्षणिक भूताविषयीं सुख- दःखांचा प्रसंग कसा व कोठे येणार ? या सर्व लोकदृष्टी स्वप्नाप्रमाणे आहेत. सुखदुःख क्षीण झाले असता प्राह्य, त्याज्य, इष्ट, अनिष्ट, शुभ, अशुभ, या दृष्टी गळतात. रम्य व अरम्य दृष्टि जाऊन, भोगेच्छा गळली व नैराश्य सतत वाढत गेले म्हणजे मन वितळून जाते मन समूळ क्षीण झाले म्हणजे संकल्पाचे नावही घ्यावयास नको. कारण तीळ जळले म्हणजे तेल कोठले निघणार? सारांश बा रघूत्तमा, हे सर्व असत् आहे, या दृढ भावनेने सर्व भावाविषयींचा संकल्प नाहीसा झाला म्हणजे त्या महात्म्याचे चित्त प्रसादशाली होते, त्यामुळे तो नित्यतृप्त व सदा एकरूप होतो आणि प्रारब्धक्षयाची प्रतीक्षा करीत जिवत राहतो ७७. सर्ग ७८-चिनस्पंदामुळे जगद्रांति होते. यास्तव योगाभ्यासाने त्याचा निरोध करावा. श्रीवसिष्ठ--कोलित फिरवू लागले असता जसें अग्निचक्र दिसते तसे चित्तस्पंदामुळे जगत् भासते. जलाच्या भावन्याप्रमाणे जग हा चित्ताचा भोवरा (आवर्त ) आहे. भाकाशांतील विविध शोभेप्रमाणे चित्तस्पंदा- पासून होणारी ही जगाची विविध शोभा आहे. श्रीराम--चित्त कोणत्या निमित्ताने स्पंदयुक्त होते व ते निश्चल कसे होईल, ते मला सागा. श्रीवसिष्ठ--रामा, बर्फ व शुभ्रता, तिळ व तेल, पुष्प व सुगंध, उष्णता व अग्नि यांच्याप्रमाणे चिस व चित्तस्पंद एकरूप झालेले आहेत. त्यातील भेद खरा नव्हे. तो कल्पित भाहे. यास्तव स्यातील कोणत्या तरी एकाचा क्षय केला की दोषांचा क्षय होतो. चित्ताच्या नाशाचे-शान