पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. मृताच्या सेकाने टवटवीत कर. तू जे जे काही करशील ते ते शात- चित्ताने कर. विषयोपभोग घेतानाही चित्ताच्या शातीस ढळू देऊ नये. शात व सम चित्ताचे तेज शरीरावरही व्यक्त होते. असल्या पुरुषाकडे पाहून क्रूर प्राण्याच्या चित्तातही आदरभाव उत्पन्न होतो. पण अशा प्रकारचा शमसपन्न पुरुष कशावरून ओळखावा, ह्मणून म्हणशील तर सांगतो. शात साधूचे चित्त प्रमत्त नसते. त्याची प्रत्येक क्रिया विचार- पूर्वक होते व त्यामुळे प्रत्येकजण त्याचे अभिनदन करितो. एकादी इष्ट किवा अनिष्ट वार्ता ऐकून त्यास हर्ष व शोक होत नाही. त्याचप्रमाणे इष्टानिष्ट स्पर्श, दर्शन, भोजन इत्यादिकाच्या योगानेही त्याच्या चित्तात चाचल्य उत्पन्न होत नाही. तो सर्व भूताचे ठायी समभाव ठेवितो. पुढे अमुक एक विषय आपणास मिळावा, अशी अगोदरच इच्छा करीत नाही अनिष्ट वस्तूचा वियोग व्हावा, असे मनात आणीत नाही. मरण, उत्सव, युद्ध इत्यादि प्रसगी त्याच्या मुखावर निजलेल्या पुरुषाप्रमाणे सदा प्रसन्नताच दिसते व कोणत्याही आपत्तीला तो भीत नाही. रामा या लक्षणानी युक्त असलेला शमसपन्न पुरुप सर्व तपस्वी, पडित, याज्ञिक व बलाढ्य राजे याहून श्रेष्ठ आहे. एवढ्याकरिता तूही दीर्घ प्रयत्नाने ही सिद्धि प्राप्त करून घे. महा प्रभावशाली साधूच्या या मार्गाचे परिपालन करण्यास तूच योग्य आहेस १३. सर्ग १५–साधुसमागम, सच्छास्त्र व भावशुद्धि यानी पुष्ट झालेला विचार, शम व __सतोष यास कारण होत असतो यास्तव त्या(विचारा)चे येथे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-शम, विचार, सतोष व सावसमागम हे मोक्षाचे द्वारपाल आहेत, असे वर झटले आहे. पण सावुसमागम, सच्छास्त्र व चित्त- शुद्धि यानी पुष्ट झालेला विचारच शम-सतोषाचे कारण आहे. यास्तव भगोदर आत्म्याचा सतत विचार करावा. शम हा मोक्षाच्या चार द्वार- पालातील पहिला द्वारपाल व विचार हा दुसरा द्वारपाल आहे. यास्तव शमाच्या वर्णनानतर विचाराचे स्वरूप, लक्षण, योग्यता इत्यादि सागितले पाहिजे. परतु अर्थानोनुबधविचार, सारासारविचार, हेयोपादेयविचार, प्रमाणतात्पर्यविचार व आत्मतत्त्वपरीक्षा असे विचाराचे पाच प्रकार आहेत. स्वाभाविक प्रवृत्ति व विषय यास अनर्थानुबधिता आणि शास्त्रीयप्रवृत्ति व वैराग्य यास पुरुषार्थानुबधिता आहे, असें अन्वयव्यतिरेकादिकाच्या योगाने