पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ७७. ८३३ होतो. प्रथम नेत्रादिकानी ग्रहण केलेलें; व नंतर हातानी उचलेलेही धन-वस्त्र-अलकारादि तो बुद्धिपूर्वक घेत नाही. कारण त्याची इद्रिये जरी बाह्य व्यापारात निमग्न असली तरी बुद्धि अतर्मुख असते. प्राण्याचा हा सर्व संचार कळसूत्री बाहुल्याच्या सचाराप्रमाणे परप्रयुक्त आहे, असें अतर्दृष्टीने पाहून शातबुद्धि पुरुषाम त्यावर अहकार ठेवणा-या लोकाचें हसू येते, ज्ञानीही सर्व करतो. पण तो भावि कृत्याची अथवा फलाची अपेक्षा करीत नाही. वर्तमान कृत्यात आसक्त रहात नाही व मागच्या गोष्टींचे स्मरण करीत नाही तो व्यवहाराविषयीं सुप्त (निद्रित ) असला तरी स्वात्म्याविषयी प्रबुद्ध असतो व व्यवहारात दक्ष असला तरी फला- विषयी निजत्यासारखा असतो. बाहेरून सर्व कर्म करतो, पण आतून काही करीत नाही. कर्तृत्वाभिमान सोडून तो प्राप्त क्रिया आप्तादिकाचें मनोरजन करीत एकाद्या आसक्त पुरुषाप्रमाणे करतो खरा, पण आतून उदासीनाप्रमाणे अमतो. इन्छा, द्वेष, शोक, हर्ष या भावाना मनात थारा देत नाही. तो सर्व मुखभोगाचा स्वत. आत्माच असतो. अनुकूल व प्रतिकूल प्राण्याविषयी तो एकसारखीच बुद्धि धारण करतो. तो भक्ताविषयी भक्तासारग्वे आचरण करणारा, शठाशी शठतुल्य होणारा, पोरामध्ये पोर. थोरामध्ये थोर, धीरामध्ये धीर, तरुणाच्या गोष्टीमध्ये तरुण आणि दु खिता- मव्य दु खितासारखा होतो. पण त्या सर्वापेक्षा याच्यामध्ये एक विशेष असतो तो हा-ज्ञानी बोलू लागला असता पुण्यकारक कयाच सागतो. बालाप्रमाणे व्यर्थ प्रलाप करीत नाही. त्याचे चित्त देन्याचा आश्रय करीत नाही. त्याची बुद्धि सात्त्विक चर्याने युक्त असते. तो सदा आनदी असतो. बालाप्रमाणे काही वेळ सुखी होत नाही. तो सौम्यवृत्ति, पुण्य- कारक कीर्तन करणारा, प्राज्ञ, प्रसन्नमुख, खेदरहित व सर्वाचा स्निग्ध बाधव, उदार चरित, सम व शीतल ( सर्व सतापहारक ) असतो. सुकृत व दुष्कृत याचा त्याला काही उपयोग होत नाही. कार्यकारणारंभ, नैष्कर्म्य, बध, मोक्ष, स्वर्ग यातील त्याला काही नको असते. त्याचे मन सुख दुःखाच्या भप्राप्ति-प्राप्तीमुळे कृपण होत नाही. ज्ञानाग्नीने संदेहजाळे जळले की त्याचा चित्तपक्षी निःशंकपणे उडून जातो. त्याचे भ्रातिशून्य मन सर्व दृष्टींत समरस असते. ते अस्त किंवा उदय पावत नाही. पाळण्यांत निजलेल्या बाळ काप्रमाणे त्याच्या अगाची चेष्टा अनुसंधानावाचूनच होत