पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५१ बृहद्योगवासिष्ठसार. बंचल लाटा व मनोरूपी जलहस्ती याच्या योगाने दुर्लक्ष्य होतो. जीवित- रूपी शेकडों नद्या त्याला येऊन मिळतात. भोगरूपी रत्नाचा हा एक अगाध करंडाच आहे. यामध्ये रोग हेच क्षुब्ध सर्प सर्वतः पसरलेले असतात. इंद्रियरूपी सुसरींनी हा अति घातुक झाला आहे. या संसार- सागरांतील स्त्रिया याच लाटा आहेत. त्या पर्वतासारख्या धीर पुरुषांनाही ओढून नेतात. राघवा, अशा दुस्तर समुद्रातून पार होणे हे मोठ्याच पुरुषार्थाचे काम आहे. पण उत्तम प्रज्ञारूपी दृढ नौका व विवेकरूपी कुशल नावाडी याचा लाभ झाला असताही जे या सागरातून तरून जात नाहीत त्याना धिक्कार असो. पारावारशून्य अशा याचे आक्रमण करून (तत्त्वदर्शनाने बाध करून) व त्याला ब्रह्ममात्र करून जो त्यात प्रवेश करतो (प्रत्यगात्म्यालाही ब्रह्मरूप करतो) तोच पुरुष होय. श्रेष्ठ आत्म- ज्ञासह विचार करून व स्वबुद्धीने ससारसागराचे तत्त्व जाणन नंतर त्यात जो क्रीडा करतो तोच चागला शोभतो. रामा, तूं धन्य आहेस. कारण तूं आपल्या विचारपर बुद्धीने इतक्या अल्पवयातही त्याचा विचार करूं लागला आहेस तुजप्रमाणेच जो प्रथम विचार करून अति रम्य बुद्धीने संसारात प्रवेश करतो तो त्यात बुडत नाही. सर्पाप्रमाणे भयप्रद असलेल्या भोगाचा प्रथम विचार करावा व नतर त्याचा उपभोग घ्यावा. ऐश्वर्याचे विचारपूर्वक तत्त्व जाणून सेवन केले म्हणजे मोठा उत्कर्ष होतो व अवि- चाराने भोगलेलें ऐश्वर्य केवल दुःख देते. वसंत ऋतृत वक्षाच्या सौंदर्यादि गुणाप्रमाणे तत्त्वज्ञाची बुद्धि व तेज वाढते. हे रघुनंदना, तुला तत्त्व कळल्यामुळे तू आता भानदामृतपूर्णसंपत्तीने अतिशय शोभत आहेस ७६. सर्ग ७७ - प्राज्ञास मस्तक व उर.स्थल या ठिकाणी धारण करण्यास योग्य असलेली जीवन्मुक्तगुणाची माळा. श्रीगम-मुनिराज, आपले भाषण कितीही ऐकले तरी कान तृप्त होत नाहीत. यास्तव भगवन् , ज्याने तत्वचमत्कार पाहिला आहे अशा पुरुषाचे उदार वृत्त मला सागा. श्रीवसिष्ठ-प्रिय शिष्या, मी तुला जीवन्मुक्ताचे लक्षण बहुत प्रकारे सागितले आहे. पण पुनः आणखी सागतो ऐक. विस्तृष्ण पुरुष हे सर्व सुषुतासारखें पहातो. जिवंतपणीच तो जणु काय केवलतेस प्राप्त झालेला आत्मज्ञ मनाला निजवून सोडतो. तो आनंदाच्या धुदीत निमः