पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८३० बृहद्योगवासिष्ठसार. विश्वामित्र, शुक इत्यादि कित्येक अरण्यांत जाऊन रहातात. छत्र-चामरांनी सुशोभित झालेले जनक, शर्याति, माधातू, सगर इत्यादि कित्येक राज्य करीत होते व आहेत. बृहस्पति, शुक्र, चंद्र, सूर्य इत्यादि किन्येक ज्योति- श्चक्रात स्थित आहेत. अग्नि, वायु, वरुण, यम इत्यादि काही ज्ञानी देव होऊन विमानात बसले आहेत. बलि, सुहोत्र, प्रल्हाद, इत्यादि काही जीव- न्मुक्त पातालांत आहेत. कर्मदोषांमुळे काही ज्ञानी तिर्यक्योनीमध्येही रहा- तात व देवामध्येही काही मूर्व निपजतात. कारण सर्वव्यापी आत्म्या- मध्ये सर्व सर्वत्र सभवते. विधीची नियती काही विचित्र आहे. विधि, देव, विष्णू , धाता, सर्वेश, शिव, ईश्वर, इत्यादि नावें या प्रयक्चेतन-आत्म्या- लाच प्राप्त होत असतात. ईश्वराच्या मायेने अवस्तूमध्ये वस्तु मिळते. वाळूत सोने सापडते व वस्तूतही अवस्तु असते. सोन्याच्या कणांतही मळ असतो. युक्तीन पाहू लागले असता अयुक्तामध्येही युक्त आढळतें. रामा, पापाच्या भयानेच लोक धर्मामध्ये निरत हात नाहीत काय ? हे साधो, असत्यामध्येही शाश्वत सत्यता दिसते. शून्य ध्यानयोगाने शाश्वतपद प्राप्त होते. देशकालवशात् नसलेलेही एकादें कार्य उदय पावते. जादूच्या खेळात सशानाही शिंगे दिसतात. वज्रासारखा दृढ (अक्षय वाटणान्या) वस्तूंचाही कालवशात् क्षय होतो. चद्र, सूर्य, पृथ्वी, सागर, देव इत्यादि कल्पाती नाश पावतात. याप्रमाणे हे महाबाहो, भावाभावाविषयी विचार करून व हर्ष, शोक, इच्छा, द्वेष यास सोडून सम हो या ससारांत असत् सत् दिसते व सत् असलेले असत् भासते. याम्तव त्याच्याविषयींची भास्था व अनास्था सोडून सत्वर सम हो. तत्त्वज्ञानाच्या अभावी कोट्यवधि लोक ससारपरपंरत पडत असतात पण ते झाडे म्हणजे जीवन्मुक्त अथवा विदेह-मुक्त पुरुष पुनः जन्ममरणपरंपरेत पडत नाहीत. मुक्ति उज्ज्वल विवेक व अविवेक याच्यायोगाने सुलभ व दुर्लभ झाली आहे. मन:- क्षय झाल्याने ती प्राप्त होते ज्याला उत्कर्षाची इच्छा असेल त्याने आत्म- ज्ञानाविषयीं यत्न करावा. आत्मदर्शनाने सर्व दुःखाचा शिरच्छेद होतो. आता तूं कदाचित् म्हणशील की पूर्वीच्या लोकाना मुक्ति मिळत होती; पण ती सांप्रतकाळी मिळणे शक्य नाही. पण ते बरोबर नाही. कारण राग (आसक्ति ) व अहंकार यानी रहित असलेले महाबुद्धिमान पुरुष वर्त- मानसमयीही पाहिजे तितके जीवन्मुक्त होऊ शकतात. मुझेत्र, जनक