पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ०५. १९ भसतानाही, सर्वोत्तम ज्ञानसंपन्न होऊन शरीरत्याग केला. सर्व देवा मुखच असा अग्नि क्रियासमूहात परायण असूनही चिरकाल यज्ञलक्ष्मीचा उपभोग घेतो व यालोकी मुक्त होऊनच रहातो. ज्याचे चित ब्रह्ममय आहे, असा सौम आकाशाचे आक्रमण करीत असताना व देव त्याचे प्राशन करीत असतानाही सुख-दुःखरहित असतो. देवगुरु बृहस्पति स्त्री- करिता चंद्राशी कलह करीत असतानाही मुक्तच होता. आकाशतलास प्रकाशित करणारा ज्ञानी शुक्र ( दैत्यगुरु ) निर्विकारमनानेच काल घाल- वीत होता. वायु सर्व प्राण्याच्या शरीरास हालवीत व सदा सर्वत्र सचार करीत असतानाही मुक्त रहातो. ब्रह्मदेव सृष्टिरचनेसारखें अति कठिण कर्म करीत असला तरी समचित्तानेच आपले दीर्घ आयष्य घालवितो. भगवान हरि मुक्त असूनही जरा, मरण, युद्ध, द्वद्व इत्यादि लीलेने यालोकी चिर- काल व्यवहार करीत रहातो. मुक्त शकरानेही एकाद्या कामुकाप्रमाणे गौ- रीला आपल्या अर्धागों धारण केले आहे. मुक्त गौरीनेही गौरवर्ण शक- राला हाराप्रमाणे आपल्या गळ्यात बाधून ठेवले. सर्व ज्ञानरूपी रत्नाचा सागर, अशा महाबुद्धिमान् पडाननाने तारकासुरादिकाशी रणक्रिया जरी केली तरी तो आतून मुक्त होता. भंगी या नावाचा एक शिवमण होता. तो देवीचा अनादर करून एकव्या शकाराचीच आराधना करण्यात तत्पर असे. त्यामळे गौरीला क्रोध आला व तो हात जोडून प्रसन्न होण्याविषयी प्रार्थना करू लागला असता देवीने-माता व पिता य.च्या शोणित-शका. पासून झालेल्या आपल्या शरीरातील मातृभाग मला निराळा करून दे. असे सागितले. तेव्हा त्या धीराने तिला रक्त-मास काढून दिले, अशी पुराणात कथा आहे. तिच्या अनुरोधाने भगी देखील रक्तमात देत अस. तानाही ध्याननिर्मल व मुक्त बुद्धीने स्थित होता. नारद मनि मुक्तस्वभाव असनही शात चित्ताने कळी लावीत जगभर फिरत असतो. हा मान्य प्रमु विश्वामित्र जीवन्मुक्त असूनही वेदोक्त यज्ञक्रिया करीत आहे. शेष पृथ्वीला धारण करतो. सूर्य दिवस परंपरा करतो व यमही जीवन्मक्त होऊन प्राण्याचे नियमन करतो. राघवा, असे आणखी दुसरेही अनेक देव, दानव, यक्ष व नर मुक्त होऊन ससारांत स्थित आहेत. अतःकरणांत शीतळ असलेले काही ज्ञानी विचित्र भाचरणयुक्त व्यवहारात निमग्न अस. तात. काही पाषाणासारखे मुक्त होऊन रहातात व भगु, भरद्वाज,