पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वृहद्योगवासिष्ठसार फस्पित कांताच्या सहागमसुखाचे विस्मरण पाडलें आहे ? कोणत्याही नाही. त्याचप्रमाणे महात्म्याध्या बुद्धीस भानंद-चित्-तत्त्वाचा विसर कोण पाडणार ! व्यसनी जन कितीही सकट ओढवली तरी ती सहन करून जसे आपलें इष्ट व्यसन पुरे करून घेतात त्याप्रमाणे ज्याचा अविद्याबंध तुटून गेला आहे, असा सदाचरसंपन्न सम्यग्दृष्टि पुरुष व्यवहार करीत असतांनाही आतल्या आत सुखच घेत असतो. त्याचे अवयव जरी तोडळे तरी तो तुटत नाही. त्याच्या नेत्रातून अश्रु गळत असले तरी तो रडत नाही. त्याला जाळले तरी तो जळत नाही व तो देहतः नष्ट झाला तरी स्वरूपतः नष्ट होत नाहीं. __ तात्पर्य, हे रामचद्रा, मनोनाश होई तो ज्याने ज्ञानभूमिकांचा अभ्यास केला आहे असा पुरुषश्रेष्ठ प्रारब्धप्राप्त फलानुरूप दारिद्यादि हीन दशेत सकटावस्थेत, पर्वतावर, वनात किवा तपोवनात जरी रहात असला तरी सदा मुग्व दुःखमबधरहित असतो. ७४. सर्ग ७५-- मोटमोठ्या अधिकारावर आरूट असताना हपशोकरहित रहाणा-या भनेक मुक्त देव-अमुर-नराचे वर्णन श्रीवसिष्ठ-निमिराज्यभार वहात असताना व तदनुरूप व्यवहार करीत अमतांनाही आतन शातचित्त व मंतापशन्य होता तुझा पूर्वज दिलीप सर्व उचित कर्मामध्ये तत्पर असतानाही विरक्त मनानं दीर्घकाल पृथ्वीचा उपभोग घेत राहिला होता. रागादि मलशन्य असल्यामुळे ज्ञानी व जीव- मुक्ताकार मनु दीर्घकाल जनतेचे पालन करीत होता. विचित्र बलशाली योद्धयाच्या अनेक भयकर युद्धात व व्यवहारातही दीधकाल निमग्न झालेला माधाता परम पदाम प्राप्त झाला आहे. पाताळातील वलि व्यवहार सत्य अमल्याप्रमाणे करीत होता तरी सदा न्यागी, सदा असक्त व जीवन्मुक्त होना. दानवाधीश नमुचि देवाशी द्वद्वयुद्ध करण्यात सदा निमग्न असे. पण तो मनामध्ये कधी खिन्न झाला नाही. इंद्राशी युद्ध करीत असताना शरीराचा त्याग करणारा उदार, मानी व देवशत्रु वृत्र आत सदा शांतचित्त असे. दान- वाची उचित कमें करणारा व पाताललोकाचा पालक प्रहाद नित्य व अनिर्वाथ्य सुग्वाम प्राप्त झाला. रामा, मायेमध्ये तत्पर असलेला पण ज्याचे चिदाकाश सदा उदित आहे असा शबरासुर या संस रमायेस सोडून शात झाला. त्या विरक्त पण कुशल मायाव्याने, हरीशी युद्ध करीत