पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ७१. ८१. अंतःसंगाचा त्याग केला म्हणजे शरीराचा एकादा अवयव कोणी कापला तरी त्यामुळे ज्ञानी पुरुषाला दुःख होत नाही. आत्मा देहातिरिक्त आहे या गोष्टीचे विस्मरण झाल्यास पुनः दुःख होईल म्हणून म्हणशील तर सांगतो. एकदा अमुक एक आपला बंधु आहे, असे कळले म्हणजे तो जसा पुनः अज्ञात होत नाही त्याप्रमाणे सदा उदित तत्व एकदा ज्ञात झाले म्हणजे पुनः त्याचे विस्मरण होत नाही. सर्पभ्राति एकदा निवृत्त झाली म्हणजे पुनः त्याच रज्जूच्या ठायीं सर्पभ्रम होत नाही; वर्षाकाळची नदी एकदा पर्वताच्या कड्यावरून खाली पडली म्हणजे पुनः वर चढत नाहीं; तापवून शुद्ध केलेले सोने मातीत पडले तरी मलिन नाही; होत त्याप्रमाणे हृदयग्रथि एकदा क्षीण झाली म्हणजे गुणान्या योगाने पुनः बंध उत्पन्न होत नाही. देठापासून सुटलेले फळ पुनः दीर्घ प्रयत्नाने तरी त्याला चिकटविता येईल का? पाषण फोडून त्याच्या उदारातून मणि काढल्यावर पुनः त्याला तेथे बसविता येत नाही. त्याप्रमाणे ही सर्व अविद्या पसरली आहे, असे कळल्यावर पुनः त्यात मग्न कोण होणार' ही चाडा- ळांची यात्रा आहे, असे कळल्यावर त्यात कोणी तरी ब्राह्मण जाईल का ? शुद्ध जलाच्या ठिकाणची दुग्धबुद्धि जशी विचाराने निवृत्त होते त्याप्रमाणे संसारवासना बुद्धिस्थ आत्म्याच्या विचाराने निवृत्त होते हे मद्य आहे, असे कळले नाही तोच ब्राह्मण ते जलाच्या समजुतीने तोंडापाशी नेतो; पण त्याचे तत्त्व कळले की तो त्याचा तत्काळ त्याग करतो, तत्त्वज्ञ लोक रूपलावण्ययुक्त असलेल्या स्त्रीलाही चित्रातील स्त्रीप्रमाणे पहातात. चित्रातील स्त्री जशी लाल, काळा, पिवळा इत्यादि रगानी रंगविलेली असते त्याप्रमाणे ही मासमय स्त्रीही रक्त, मास, केस, इत्यादिकाच्या योगाने बनविलेली आहे. मग तिच्याविषयीच एवढी आसक्ति का ? गुळाच्या गोडीचा अनुभव आला असता त्याला बदलन तिखट किंवा खारट करण्याचे जसे दुसऱ्या कोणाचे सामर्थ्य नाही त्याप्रमाणे आत्म्याचा अनुभव कोणालाही बदलता येत नाही. व्यभिचारिणी स्त्री गहकमें करीत मसतानाही आतल्या आत परसंगाचे चितन करीत असते त्याप्रमाणे ज्ञानी व्यवहारसमयींही आंत आत्मानुभव घेत असतो. ऋद्ध परतत्त्वामध्ये विश्रांति घेणाऱ्या धीराला इंद्रादि देवही स्वरूपापासून चाळवू शकत नाहीत परपुरुषाचे व्यसन लागलेल्या स्त्रीला, तिच्या कोणत्या बलाढ्य पतीने