पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ७१. नाही, असा निश्चय शास्त्र व युक्ति यांच्या द्वारा झाला की, ती भागेकाप उन्हांतील बर्फाप्रमाणे वितळते. या जड दहाकरितां भोगसाधने सपादन करून काय करावयाचे आहे ! त्याची काही गरज नाही; असा निषय झाला की आशामल पार नाहीसा होतो. आशा गेली की पुरुषाचा मुखचंद्रमा चमकू लागतो. त्यावरील दीनता पार नाहीशी होते. तो अति शीतळ होतो. दरिद्याला राज्य मिळाले असता त्याला जसा आनद होतो त्याप्रमाणे आशारहित पुरुष परम मुखी होतो. त्याचा आनंद त्यान्या शरीरात मावत नाही. त्याचा सर्व क्षोभ नाहीसा होतो. तो परम धैर्य व स्थैर्ययुक्त होतो. अमृतप्राशन केल्याप्रमाणे तो तृप्त होतो. तो आपल्याच शुद्ध चित्तात सर्वात्मक, सर्वगत, सर्वेश, सर्वनायक, सर्वाकार व निराकार स्वात्म्यास पहातो. पूर्वीच्या चित्तचाचल्याचे व कामपीडेचे स्मरण झालें असता त्याला हसू येते. विषयी-जनाचा सग व विषयानुर जन यापासून दर झालेला तो शातचित्त, अध्यात्मरति, पूर्ण व पावनमानस होऊन रहातो. द्वंद्वदोष व भय यातून मुक्त व ससारसागरातून उत्तीर्ण झालेल्या त्याला अलभ्य पदप्राप्ति झाल्याकारणाने अत्युत्तम विश्राति मिळते. पुनरा- वृत्तिशून्य साम्राज्यास प्राप्त झालेला तो शरीर, मन व वाणी याच्या योगानें काही करीत नाही. सर्व जन ज्याच्या आचरणास ग्राह्य समजतात असा तो काही वाछीत नहीं सर्वानी ज्याच्या आनदास अनुमोदन दिले आहे असा तो स्वतः कशालाही अनुमोदन देत नाही. तो काही देत नाहीं; घेत नाही, कोणाची स्तुति करीत नाही, निंदा करीत नाही; त्याचे स्वरूप कधी गुप्त होत नाही व कधी उदय पावत नाही; तो सतुष्ट होत नाहीं व शोक करीत नाही. तो सर्व कर्माचा त्याग करणारा, सर्व उपाधिशून्य, व सर्व आशारहित होतो. म्हणूनच तो जीवन्मुक्त होय. सर्व इच्छा सोडून मनाने मौनी व्हावे मनात बिंबलेल्या निराशेप्रमाणे तरुण स्त्रीचे दृढ आलिग- नही सुख देत नाही. नैराश्य जसे सुखी करते तसा चंद्रही आह्लाद देत नाही. नैराश्यामुळे ज्याचे मन सम झाले आहे असा उदारबाद्ध मौनी जसा शोभतो तसा पुष्पपूर्ण नूतन-लतायुक्त वमतही शोभत नाही. नैराश्यापासून जें शैत्य प्राप्त होते ते हिमालय, मोत्ये, केळीचे वन, चंदन, व चंद्र यापासूनही प्राप्त होत नाही. राज्य, स्वर्ग व कातासमागम याहून नैराश्याचे सुख अधिक आहे. त्रिभुवनसंपत्ति तृणासारखी तुच्छ आहे,